JOIN US
मराठी बातम्या / मनी / 5 G स्पेक्ट्रम : मोदी सरकार सगळ्या कंपन्यांना देणार ट्रायलची संधी

5 G स्पेक्ट्रम : मोदी सरकार सगळ्या कंपन्यांना देणार ट्रायलची संधी

नव्या वर्षात तंत्रज्ञान क्षेत्रात सुवर्णसंधी येणार आहेत. सरकार टेलिकॉम क्षेत्रातल्या सगळ्या कंपन्यांना5 G स्पेक्ट्रमची चाचणी घेण्याची संधी देईल, असं केंद्रीय दळणवळण रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : नव्या वर्षात तंत्रज्ञान क्षेत्रात सुवर्णसंधी येणार आहेत. सरकार टेलिकॉम क्षेत्रातल्या सगळ्या कंपन्यांना 5 G स्पेक्ट्रमची ट्रायल घेण्याची संधी देईल, असं केंद्रीय दळणवळण रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. आम्ही 5 G च्या चाचण्यांबद्दल निर्णय घेतला आहे. 5G हेच भवितव्य आहे. या तंत्राच्या मदतीने आम्ही नव्या संशोधनाला प्रोत्साहन देणार आहोत,असं त्यांनी सांगितलं. सगळेच टेलिकॉम ऑपरेटर्स 5 G च्या चाचण्यांमध्ये भाग घेऊ शकतात. ANI ✔ @ANI Union Minister Ravi Shankar Prasad: We have taken a decision on 5G trials. 5G is the future. We will encourage new innovations. All operators can participate in the 5G trials. सरकारने 5 G च्या चाचण्या केल्या तरी अजून व्यावसायिकदृष्ट्या याचा वापर सुरू केलेला नाही. दूरसंचार विभाग टेलिकॉम क्षेत्रातल्या सगळ्याच कंपन्यांशी करार करेल. यानंतर कंपन्या त्यांचा व्हेन्डर पार्टनर निवडतील. यामध्ये नोकिया, हुवावे, एरिक्सन, सॅमसंग या कंपन्यांचा समावेश आहे. (हेही वाचा : PPF,सुकन्या,NSC च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी, मोदी सरकार करणार काही बदल) याच महिन्याच्या सुरुवातीला टेलिकॉम विभागाने पुढच्या स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यासाठी मंजुरी दिली होती. यात 6,030 मेगाहर्टच्या एअरवेव्हचा समावेश आहे. 5 G तंत्रासाठी याचा वापर होईल. हुवावे साठी दिलासा हुवावे टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. या कंपनीला जागतिक स्तरावर धक्का बसला होता. या कंपनीला जर भारतात मज्जाव करण्यात आला असता तर देशात 5 G सेवा सुरू व्हायला 3 वर्षं जास्त लागली असती. आता मात्र हुवावेला 5G ची 50 कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यात यश आलंय. ======================================================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या