JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / मोदी सरकारकडून स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! घेऊ शकता या योजनेचा लाभ

मोदी सरकारकडून स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! घेऊ शकता या योजनेचा लाभ

भारत सरकार सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीम (Sovereign Gold Bond Scheme) अंतर्गत स्वस्तात सोने विक्री करत आहे. 6 जुलैपासून या बाँडची विक्री सुरू होणार आहे.

019

भारत सरकारच्या सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign gold bond)योजनेचा पुढचा टप्पा 6 जुलैपासून सुरू होणार आहे. याआधीच्या टप्प्यात तुम्ही जर गुंतवणूक करू शकले नसाल तर या टप्प्यात गुंतवणूक करण्याची संधी आहे.

जाहिरात
029

सरकारी गोल्ड बाँड स्कीम 2020-21 सीरीज-4 चे सब्सक्रिप्शन 6 जुलै 2020 रोजी सुरू होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) केलेल्या घोषणेनुसार सॉव्हरेन गोल्ड बाँड 20 एप्रिल ते 2 सप्टेंबर 2020 पर्यंत एकूण सहा टप्प्यांमध्ये जारी करण्यात येणार आहेत.

जाहिरात
039

आरबीआय भारत सरकारतर्फे हे गोल्ड बाँड जारी करणार आहे. या सीरिजसाठी गोल्ड बाँडची इश्यू करण्यात आलेली किंमत 4,852 रुपये प्रति ग्रॅम आहे.

जाहिरात
049

याआधी 8 जून ते 12 जूनदरम्यान जारी करण्यात आलेल्या गोल्ड बाँडची किंमत 4,677 रुपये प्रति ग्रॅम होती.

जाहिरात
059

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, इश्यू प्राइस सब्सक्रिप्शनच्या आधीच्या आठवड्यात शेवटच्या तीन व्यवहाराच्या दिवसांसाठी IBJA कडून जारी करण्यात आलेल्या 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीची सरासरी काढून निश्चित केली जाते. यासाठी बाजार बंद होताना जी किंमत असते ती ग्राह्य धरली जाते.

जाहिरात
069

त्याचप्रमाणे ऑनलाइन पेमेंट केल्यास प्रत्येक बाँडमधील प्रति ग्रॅम सोन्यावर 50 रुपयांची सूट देण्यात आली आहे. म्हणजे ऑनलाइन अर्ज करून सोने खरेदी केल्यास प्रति ग्रॅम 4,802 रुपयांनी सोने खरेदी करता येईल.

जाहिरात
079

या योजनेअंतर्गत कमीत कमी 1 ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करता येऊ शकेल. यामध्ये गुंतवणूक करताना तुम्ही एका आर्थिक वर्षामध्ये 500 ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकता. कमीतकमी गुंतवणूक 1 ग्रॅमची आहे.

जाहिरात
089

Sovereign Gold Bond ची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून होते. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही बाँड योजनेमध्ये सामील होऊ शकता.

जाहिरात
099

सोन्याचे दराने यावर्षी रेकॉर्ड तोडले आहेत. अशावेळी असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, यावर्षी सोन्याच्या किंमती 53 हजाराचा टप्पा गाठू शकतात. त्यामुळे सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीमला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या