गॅस सिलिंडर
मुंबई : आधीच महागाईमुळे हाल झाले असताना आता सर्वसामान्य लोकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. आजपासून एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल झाला आहे. दर महिन्याच्या सुरुवातीला LPG गॅस सिलिंडर च्या दरात बदल होत असतात. आजपासून नवे दर महिन्याभरासाठी लागू असणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 83 रूपये 50 पैशांची कपात झाली असून घरगुती सिलेंडरचे दर मात्र जैसे थे आहेत. यापूर्वी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅसच्या किमतींत 172 रुपयांनी कपात करण्यात आली होती.
नवी दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत 83.5 रुपयांनी कमी झाली असून ती आता 1 हजार 773 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1 हजार 103 रुपयांवर कायम आहे.
गॅस सिलिंडरमधून का येतो उग्र वास? यामुळेच वाचतो तुमचा जीवकोलकातामध्ये सिलिंडर 85 रुपयांनी स्वस्त झाला असून तो आता 1960.50 रुपयांवरून 1875.50 रुपयांवर आला आहे. आता पाटण्यात 19 किलो निळ्या LPG सिलेंडरची किंमत 2037 रुपये आहे. मुंबईत तो 1808.5 रुपयांवरून 1725 रुपयांवर 83.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. चेन्नईमध्ये तो 2021.50 रुपयांवरून 84.50 रुपयांवरून 1937 रुपयांवर आला आहे.
इंदूरमधील व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1877 चा आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये आहे. कोलकात्यात 1129 रुपये, मुंबईत 1102.5 रुपये, चेन्नईमध्ये 1118.5 रुपये, भोपाळमध्ये 1108.5 रुपये, जयपूरमध्ये 1106.5 रुपये, इंदूरमध्ये 1131 रुपये, अहमदाबादमध्ये 1110 रुपये आणि लखनऊमध्ये 1140.5 रुपये आहेत.