JOIN US
मराठी बातम्या / मनी / Loan Tips: कर्जाच्या कचाट्यात सापडलाय का? या सोप्या टिप्स ठरतील उपयोगी

Loan Tips: कर्जाच्या कचाट्यात सापडलाय का? या सोप्या टिप्स ठरतील उपयोगी

How to recover from Loan: आपण विविध कारणांसाठी कर्ज काढतो. परंतु घेतलेलं कर्ज फेडणं अनेकांना जमत नाही आणि कर्जाचा डोंगर झाल्यामुळं अनेकांचं जगणं मुश्किल होतं.

जाहिरात

कर्जाच्या कचाट्यात सापडलाय का? या सोप्या टिप्स ठरतील उपयोगी

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 ऑगस्ट: आपण विविध कारणांसाठी कर्ज (Loan) काढतो. घर कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज अशी विविध कर्ज लोक काढत असतात. मात्र कर्जाचा डोंगर झाल्यामुळं अनेकांचं जगणं मुश्किल होतं. कारण कर्ज ही गोष्ट वाटते तितकी सोपी नसते. कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या माणसाला सहज बाहेर पडणं अवघड असतं. आपत्कालीन किंवा इतर कोणत्याही कारणानं कर्ज घेतल्यानंतर आर्थिक संकट उद्भवल्यास क्रेडिट कार्डची बिलं (Credit Card), कार किंवा गृहकर्ज (Home Loan) आणि इतर कर्जांची ईएमआय इत्यादीची परतफेड करणंही कठीण होऊन बसतं. या कारणांमुळे लोक कर्जाच्या जाळ्यात अडकतात. आजच्या काळात आपल्या स्वप्नातलं घर बांधायचं असो, मुलांना चांगलं शिक्षण देणं असो की वाहन खरेदी करायचं असो काही ना काही कामासाठी कर्ज घ्यावं लागतं. पण कधी कधी हे कर्जही मोठी समस्या बनतं. अशी परिस्थिती तुमच्या समोर आली तर घाबरू नका. कारण आज आम्ही तुम्हाला कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्हाला नक्की उपयुक्त ठरू शकतात. एकदा तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकलात की, नवीन कर्ज घेऊन जुनं कर्ज फेडण्याचा मार्गही उरत नाही, कारण ईएमआय पेमेंटमधील डिफॉल्टचा तुमच्या सिबिल स्कोअरवरही वाईट परिणाम होतो. खराब CIBIL रिपोर्टमुळं दुसरं कर्ज मिळणं खूप कठीण होतं. कारण कोणतीही बँक किंवा कर्जदाता तुमचे कर्ज पास करण्यापूर्वी तुमचा CIBIL स्कोर तपासतो.जर तुम्ही कर्जाच्या सापळ्यात वाईटरित्या अडकले असाल, तर तुमच्या कर्जाची आणि प्रलंबित बिलं भरण्याची रणनीती अतिशय हुशारीनं करा. तुमच्या सर्व थकित कर्जांची यादी तयार करा, त्यानंतर तुम्ही कोणतं कर्ज आधी फेडायचं ते ठरवा. तुमच्यावरील सर्व प्रकारच्या कर्जाचे प्राधान्याने वाटप करा. सर्वात मोठे आणि सर्वाधिक व्याजदर असलेलं कर्ज आधी फेडलं जावं, अशी रणनीती असावी, जसं की क्रेडिट कार्ड कर्ज किंवा बिल इत्यादी. हेही वाचा: वडिलांच्या मृत्यूनंतर कर्जाचं काय होतं? मुलांनी ते फेडणं बंधनकारक?

 जर तुम्ही आर्थिक संकटात असाल आणि सध्याच्या कर्जाचा हप्ताही भरण्यास सक्षम नसाल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या बँकेच्या अधिकार्‍यांना तुमच्या सद्य आर्थिक परिस्थितीबद्दल सांगावं. यासोबतच कर्ज फेडण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. अशा प्रकारे तुम्ही EMI दाब कमी करू शकाल. तसेच, अधिक वेळ मिळवून, तुम्ही कमाईसाठी अधिक पर्याय शोधण्यात सक्षम व्हाल.जर तुम्ही कर्जात अडकले असाल, तुम्हाला कोठूनही दुसरं कर्ज मिळू शकत नसेल, तर अशा वेळी तुमची स्थावर मालमत्ता तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करण्यास मदत करू शकते. तुम्ही तुमची बचत कर्ज फेडण्यासाठी देखील वापरू शकता. मालमत्ता गहाण ठेवून किंवा काही भाग विकून, मोठे कर्ज फेडून तुम्ही कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडू शकता. जर तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल तर त्यांच्या मदतीनंही तुम्ही कर्जाच्या संकटातून मुक्त होऊ शकता.

कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून तुम्ही गोल्ड लोनची देखील निवड करू शकता. या अंतर्गत तुम्ही सोन्याचे दागिने आणि नाण्यांवर सहज कर्ज घेऊ शकता. तुमच्या मालमत्तेचा वापर करण्याचा हा सर्वोत्तम आणि जलद मार्ग आहे. या प्रकारच्या कर्जावर वर्षाला सुमारे 8 ते 15 टक्के व्याज द्यावा लागतो. त्यामुळे जर तुमच्याकडे जास्त व्याजदर असलेलं कर्ज असेल तर तुम्ही ते परतफेड करण्यासाठी वापरू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या