मुंबई : आपल्याला पैशांची गरज असेल तर आपण बँकेकडे जातो. बँक आपल्याला वेगवेगळं आमिष दाखवतात आणि आपण त्याला बळी पडतो. पण कधी आपण त्याबाबत सविस्तर अभ्यास करत नाही. याचा फायदा बऱ्याचदा लोन देणारे घेतात आणि आपल्याकडून जास्तीचे पैसे वसूल करतात. समजा तुम्हाला 5 लाखाचं पर्सनल लोन हवं असेल तर कोणती बँक तुम्हाला किती व्याजदर देणारे हे पाहा. त्याचा अभ्यास करा त्यानंतर कोणत्या बँकेतून लोन घ्यायचं हे ठरवा. सरसकट लोन हवं म्हणून अर्ज भरला आणि लोन घेतलं तर त्या बँकेचे दर लागू होतील. उदाहरणावरून समजून घेऊ. सूरज नावाच्या व्यक्तीने बँकेकडे 5 लाखांसाठी लोन मागितलं. यामध्ये 5 लाखांचं पर्सनल लोन द्यायला बँक तयार झाली. तेही 14 टक्के व्याजाने, पण सूरजने थोडा अभ्यास केला होता. काही बँकांचे व्याजदर कमी होते हे त्याला माहिती होतं. त्याने तशी माहिती बँकेत दिली. त्याला बँकेनं 10 टक्के व्याजदराने लोन देणं कबुल केलं. आता पुढे सूरजने कागदपत्र सही करायला घेणार तेवढ्यात त्याला एक गोष्ट लक्षात आली. हा रेट ऑफ इंटरेस्ट फ्लॅट असेल की रिड्युसिंग बॅलन्सवर असणार याबाबत चौकशी करावी. त्याने विचारल्यानंतर लोन कर्मचारी थोडी गोंधळला. त्याला लक्षात आलं की याला माहिती आहे.
‘या’ वस्तूंवर एक टक्केही द्यावा लागत नाही टॅक्स, पाहा लिस्टदोन्ही गोष्टींमध्ये काय फरक? फ्लॅट रेट म्हणजे दर महिन्याल तुम्हाला एक ठरावीक रक्कम भरावी लागेल. तुमच्या EMI सोबत जी व्याजाची रक्कम जोडली असेल ती दर महिन्याला एक ठरावीक रक्कम असेल, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. हा इंटरेस्ट तुमच्या ओरिजनल अमाउंटवर आकारला जाणार आहे. रिड्युसिंग बॅलन्समध्ये इंटरेस्ट नेहमी तुमच्या रिड्युसिंग बॅलन्सवर लावला जातो. जसं तुमचं प्रिन्सिपल अमाउन्ट कमी होईल तशी तुमच्या व्याजदराची रक्कम कमी होईल. बँकवाले जेव्हा तुम्हाला सांगतात की 10 टक्के किंवा 14 टक्के व्याजदराने लोन देतो तेव्हा ते त्याचा इफेक्टिव्ह रेट 17 टक्क्यांपर्यंत जातो. म्हणजे तुम्ही 3 टक्के पैसे जास्त भरता. ही रक्कमही मोठी असते.
Price Hike: कार खरेदी करण्याचा प्लॅन, 1 जानेवारीपासून वाढणार किंमतीलोन घेताना त्यामागचे हे सिक्रेट मुद्दे तुम्हाला जर माहिती नसतील तर तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. विचार करा 3 टक्के दर वर्षाचे म्हणजे किती मोठी रक्कम होईल. त्यामुळे तुम्ही लोन घेत असाल तर अशी चूक करू नका. या गोष्टींचा अभ्यास नक्की करून जा म्हणजे तुमची आर्थिक बचत होईल.