मराठी बातम्या /
मनी /
काय सांगता! म्युच्युअल फंडांवर देखील मिळतं कर्ज, समजून घ्या सोपी प्रक्रिया
काय सांगता! म्युच्युअल फंडांवर देखील मिळतं कर्ज, समजून घ्या सोपी प्रक्रिया
Mutual Fund: कोणत्याही बँक किंवा NBFC कडून काही म्युच्युअल फंडांवर कर्ज मिळू शकतं. तुम्ही म्युच्युअल फंडांवर ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून सहज कर्ज घेऊ शकता.
मुंबई, 12 डिसेंबर: जर तुम्हाला अचानक एखाद्या अडचणीमुळं पैशांची गरज भासली आणि तुमच्याकडे म्युच्युअल फंड असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे म्युच्युअल फंड विकूनही पैसे मिळवू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही बँक किंवा NBFC कडून या म्युच्युअल फंडांवर कर्ज मिळेल. तुम्ही म्युच्युअल फंडांवर ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून सहज कर्ज घेऊ शकता. म्युच्युअल फंड युनिट्सवरील कर्ज ओव्हरड्राफ्ट सुविधेच्या स्वरूपात उपलब्ध होऊ शकतं. जमा झालेल्या रकमेवरच व्याज आकारले जाते. कर्जाची रक्कम युनिटच्या बाजार मूल्यापेक्षा कमी असते. याला मार्जिन म्हणतात. साधारणपणे, इक्विटी फंडावरील मार्जिन म्युच्युअल फंड युनिट्सच्या मूल्याच्या 50-60 टक्के पर्यंत असते. डेट फंडाच्या बाबतीत, ते NAV च्या 75-80 टक्क्यांपर्यंत असतं. अशा प्रकारे म्युच्युअल फंडांवर मिळेल कर्ज -
म्युच्युअल फंड युनिट्सच्या बाजार मूल्याच्या 60 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकतं. यासाठी म्युच्युअल फंड युनिट्स विकण्याची गरज नाही. त्याच वेळी, कर्जासाठी जास्त वेळ प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. बहुतेक बँका आणि NBFC म्युच्युअल फंडांवर कर्ज देतात.
म्युच्युअल फंडांवर कर्ज घेण्यासाठी, तुम्हाला बँक किंवा एनबीएफसीमध्ये म्युच्युअल फंडाविरुद्ध कर्जासाठी अर्ज करावा लागेल. कर्ज देण्यापूर्वी बँक किंवा NBFC तुमच्या म्युच्युअल फंडाचे युनिट गहाण ठेवते.
युनिटच्या बाजार मूल्यावर आधारित तुम्हाला कर्ज दिले जाते. कर्ज देताना जोखमीचीही काळजी घेतली जाते.
तुम्ही म्युच्युअल फंडावर कर्ज घेतल्यास तुम्हाला युनिट्स विकण्याची गरज नाही. पैशाची गरज कमी कालावधीत पूर्ण होते. निष्क्रिय म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा लाभ मिळतो.
दिलेले व्याज लिक्विड फंडावरील कमाईपेक्षा कमी असेल. तुम्ही म्युच्युअल फंडांवर कर्ज घेतल्यास तुमच्यावर व्याजाचा बोजा खूपच कमी होईल.
वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत म्युच्युअल फंडांवर घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा दर खूपच कमी असतो.
म्युच्युअल फंडांवर कर्ज घेतल्यावर 10-12 टक्के दरानं व्याज द्यावं लागेल. तुम्हाला कर्जासाठी 0.5-0.75 टक्के दरानं प्रक्रिया शुल्क देखील भरावं लागेल.
जर तुम्ही म्युच्युअल फंडावर कर्ज घेतलं असेल आणि तुम्ही कर्जाची परतफेड करू शकत नसाल तर बँक तुमचे युनिट विकून तुमचे कर्ज वसूल करेल. जर जास्तीचे पैसे शिल्लक असतील तर ते तुम्हाला दिले जाऊ शकतात.
म्युच्युअल फंडाची विक्री करण्यापूर्वी बँक याबाबत ग्राहकांची परवानगीही घेईल.
तुम्ही म्युच्युअल फंडांवर घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्यास, तुमचे युनिट्स तारण ठेवले जाणार नाहीत.
बँक किंवा वित्तीय कंपनीला फंड हाउसकडून कर्ज परतफेडीची माहिती मिळताच फंड हाऊस त्या युनिट्सना मुक्त करेल.
या गोष्टींची घ्या काळजी-
म्युच्युअल फंड युनिट्सवर कर्ज घेणे इतर कर्जांपेक्षा सोपे आहे.
जेव्हा पैशाची मोठी गरज असते तेव्हाच कर्ज घेणे योग्य आहे.
यावर बँका 10-11 टक्के दराने व्याज आकारतात.
जर परतावा 8-10 टक्के असेल तर नुकसान होऊ शकते.
पैसे परतफेड होईपर्यंत म्युच्युअल फंड विकता येत नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.