JOIN US
मराठी बातम्या / मनी / वेळेपूर्वी कर्ज फेडायचा विचार करता? पण असं करणं फायद्याचं की तोट्याचं? अवश्य घ्या जाणून

वेळेपूर्वी कर्ज फेडायचा विचार करता? पण असं करणं फायद्याचं की तोट्याचं? अवश्य घ्या जाणून

तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलं असेल, तर तुम्हाला संपूर्ण कर्जाची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच परतफेड करण्याचा पर्याय मिळेल. पण असं करणं खरंच फायद्याचं असतं का? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

जाहिरात

वेळेपूर्वी कर्ज फेडावं की नाही?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 9 एप्रिल: अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते, जेव्हा अचानक आपल्याला पैशांची गरज भासते. मात्र आपली सेव्हिंग तेवढी नव्हते. तेव्हा लोक अनेकदा बँकेकडून कर्ज घेतात. पण नंतर त्याचा EMI दीर्घकाळ भरावा लागतो. त्यासोबतच तुमच्याकडून भरघोस व्याजही आकारले जातं. अनेकदा तुमच्या कर्जाची मुदत संपण्यापूर्वीच कर्ज फेडण्याऐवढा पैसा तुमच्याकडे आला तर तुम्ही वेळी पूर्वीच कर्ज फेडू शकता. लोन फोर-क्लोजिंग करताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. त्याचे काही फायदे आहेत आणि काही तोटेही असू शकतात. आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की, लोन फोरक्लोज करणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे की, तोट्याचे…

वेळेपूर्वीच लोन फेडण्याचे फायदे

वेळेपूर्वी कर्ज फेटून टाकलं तर तुमच्या कर्जावरील व्याजाची बचत होते. तुम्ही एकापेक्षा जास्त कर्ज घेतलं असेल तर ज्या कर्जाचं व्याज जास्त आहे, ते कर्ज तुम्ही फेडू शकता. अशाप्रकारे, तुम्ही पर्सनल लोन, कार किंवा बाईक लोन, क्रेडिट कार्ड ईएमआय इत्यादी एक एक करून फेडू शकता. त्याच वेळी, तुमच्याकडे कर्ज ट्रान्सफर करण्याचा पर्याय देखील आहे. तुम्ही तुमचे कर्ज जास्त व्याजदर असलेल्या बँकेकडून कमी व्याजदर असलेल्या बँकेत ट्रान्सफर करू शकता.

सोसायटीत फ्लॅट खरेदी करताय? स्विमिंग पूल आणि क्लब नाही, तर ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष

वेळेपूर्वी कर्ज फेडण्यासाठी लागतो चार्ज

अनेक बँका वेळेपूर्वी कर्जाची परतफेड करण्यासाठी ग्राहकांकडून चार्जेस आकारतात. तुम्ही तुमचे कोणतेही कर्ज फेडण्याचा विचार विचार करत असाल, तर प्रथम तुम्ही बँकेत त्याची चौकशी करावी. अनेक बँका उर्वरित कर्जाच्या रकमेच्या 1 ते 5 टक्के रक्कम आकारतात. त्या असं करतात जेणेकरुन त्यांना व्याजावरील नुकसानाची भरपाई करता येईल. फोर-क्लोजिंग चार्ज आणि उर्वरित ईएमआयवरील व्याज या दोन्हीची गणना करून, तुम्ही कर्जाची परतफेड करायची की नाही हे ठरवू शकता.

PPF, NSC सारख्या योजनांमध्ये पैसे गुंतवलेय? चुकूनही विसरु नका हे काम, अन्यथा…

संबंधित बातम्या

हे सर्टिफिकेट अवश्य घ्या

कर्जाचे फोर-क्लोजिंग केल्यानंतर तुम्ही त्याचं एनओसी सर्टिफिकेट घेणं आवश्यक असतं. हे सर्टिफिकेट तुम्ही कर्जाची परतफेड केल्याचा पुरावा आहे. याशिवाय, होम लोन किंवा प्रॉपर्टीशी संबंधित सर्व बाबींच्या व्यवहाराच्या तपशीलासाठी NEC म्हणजेच नॉन-कॅम्ब्रन्स प्रमाणपत्र मिळवावे लागते. त्याच वेळी, कर्ज भरल्यानंतर, तुमचा सिबिल स्कोअर वेळेवर अपडेट झाला आहे याचीही खात्री करावी लागेल. कारण साधारणपणे या प्रक्रियेसाठी बराच वेळ लागतो. ज्याचा तुमच्या CIBIL स्कोअरवर परिणाम होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या