JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / Jan Dhan खाते असल्यास लवकर पूर्ण करा हे काम, नाहीतर मिळणार नाही 1.30 लाखांचा फायदा

Jan Dhan खाते असल्यास लवकर पूर्ण करा हे काम, नाहीतर मिळणार नाही 1.30 लाखांचा फायदा

जनधन खात्यांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत बँक खाते पोहोचले आहे. हे खाते झिरो बॅलन्सवर कोणत्याही बँकेत सुरू करता येते. यामध्ये ओव्हरड्राफ्ट आणि रुपे कार्डसह विविध सुविधा मिळतात. या खात्याशी संबंधित एक काम पूर्ण न करणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं

0107

जनधन खात्यांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत बँक खाते पोहोचले आहे. हे खाते झिरो बॅलन्सवर कोणत्याही बँकेत सुरू करता येते. यामध्ये ओव्हरड्राफ्ट आणि रुपे कार्डसह विविध सुविधा मिळतात.

जाहिरात
0207

तुम्ही देखील जनधन खाते (JanDhan Bank Account) उघडले असेल तर तुमचे खाते लवकरच तुमच्या आधार कार्डशी (Link Aadhar with Jan Dhan) लिंक करा. हे काम पूर्ण न केल्यास ग्राहकांना मिळणाऱ्या विविध योजना रोखल्या जाऊ शकतात.

जाहिरात
0307

खाते आधारशी लिंक न केल्यास 1.30 लाखांचे मोठे नुकसान- या खात्यामध्ये, ग्राहकांना RuPay डेबिट कार्ड दिले जाते, ज्यामध्ये 1 लाख रुपयांचा अपघात विमा उपलब्ध आहे, परंतु जर तुम्ही तुमचे खाते आधारशी लिंक केले नाही तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुमचे एक लाख रुपयांचे नुकसान होईल. याशिवाय तुम्हाला या खात्यावर 30000 रुपयांचे अपघाती मृत्यू विमा संरक्षण देखील मिळते. जो बँक खात्याशी आधार लिंक झाल्यावरच उपलब्ध होते. अर्थात आधार कार्ड जनधन बँक खात्याशी लिंक नसल्यास तुम्हाला या 1 लाख 30 हजाराच्या फायद्याला मुकावे लागेल.

जाहिरात
0407

1. बँकेत जाऊन लिंक करता येईल आधार कार्ड- तुम्ही बँकेत जाऊन तुमच्या खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक करू शकता. याकरता बँकेत तुम्हाला आधार कार्डची एक फोटो कॉपी आणि तुमचे पासबुक घेऊन जावे लागेल

जाहिरात
0507

2. SMS च्या माध्यमातून लिंक करता येईल आधार कार्ड- अनेक बँका एसएमएसच्या माध्यमातून बँक खात्याशी आधार लिंक करण्याची सुविधा देतात. उदा. SBI ग्राहक त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुन UID<SPACE>आधार नंबर<SPACE>खाते क्रमांक असा मेसेज टाइप करून 567676 या क्रमांकावर पाठवू शकतात.

जाहिरात
0607

3. ATM च्या माध्यमातून लिंक करा आधार- तुम्ही तुमच्या जवळच्या एटीएममध्ये जाऊन बँक खाते आणि आधार कार्ड लिंक करू शकता. दरम्यान जर तुमचे आधार कार्डासाठी आणि बँकेत दिलेला मोबाइल क्रमांक वेगळा आहे तर लिंकिंग प्रक्रिया होणार नाही.

जाहिरात
0707

अशाप्रकारे सुरू करा जनधन खातं- तुम्हाला तुमचे जनधन अकाउंट उघडायचे असेल तर जवळच्या बँकेत भेट द्या. तिथे जनधन अकाऊंटचा फॉर्म भरा. त्याठिकाणी तुमची आवश्यक सर्व माहिती द्या. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या ब्रांचचे नाव, पत्ता, नॉमिनी (वारसदार), व्यवसाय / रोजगार, वार्षिक उत्पन्न, घरातील सदस्य संख्या, एसएसए कोड किंवा वार्ड नंबर, व्हिलेज कोड (गावाचा नंबर) याबद्दल माहिती द्यावी लागेल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या