JOIN US
मराठी बातम्या / मनी / LIC ची नवीन पॉलिसी लाँच, 15 वर्षांनंतर 21 लाखांचा लाइफ कव्हर; वाचा सविस्तर

LIC ची नवीन पॉलिसी लाँच, 15 वर्षांनंतर 21 लाखांचा लाइफ कव्हर; वाचा सविस्तर

नुकतीच एलआयसीनं ग्राहकांसाठी धनवर्षा पॉलिसी नावाची एक नवी योजना सुरू केली आहे, याबद्दल जाणून घ्या माहिती

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 18 ऑगस्ट : मुलांचं शिक्षण, कार किंवा घरखरेदी, अचानक उद्भवणारा खर्च, आजारपण, परदेश प्रवास आदी गोष्टी प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वपूर्ण असतात. या गोष्टींसाठी प्रत्येकजण आर्थिक नियोजन करत असतो. सर्वसामान्यपणे नोकरदार वर्गाचा बचत किंवा गुंतवणुकीसाठी खात्रीशीर पर्यायांना जास्त पसंती देतो. बचत आणि गुंतवणूकीसोबतच विमा पॉलिसीलाही महत्त्व दिलं जातं. सध्याच्या काळात बाजारात अनेक खासगी वित्तीय संस्थांच्या आकर्षक विमा योजना आहेत. मात्र, बहुतांश लोकांचा कल भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या योजनांकडे जास्त असतो. अर्थात यामागे सुरक्षितता आणि खात्रीशीर परतावा ही प्रमुख कारणं आहेत. नुकतीच एलआयसीनं ग्राहकांसाठी धनवर्षा पॉलिसी नावाची एक नवी योजना सुरू केली आहे. या योजनेची खास अशी वैशिष्ट्ये आहेत. ग्राहकांनी आपल्या गरजेनुसार दहा किंवा 15 वर्षांसाठी पॉलिसी टर्म निवडली तर त्यांना दमदार परतावा मिळू शकतो. एलआयसीने धनवर्षा पॉलिसी नावाची नवी योजना सुरू केली आहे. धनवर्षा पॉलिसी सिंगल प्रीमियम प्लान आहे. याचाच अर्थ या योजनेत ग्राहकांना एकदाच प्रीमियम भरावा लागेल. धनवर्षा पॉलिसी ही एक बचत तसेच जीवन विमा योजना आहे. यात ग्राहकाला एकदाच गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर त्याला आयुष्यभर लाइफ कव्हरसह खात्रीशीर मॅच्युरिटीचा लाभ मिळेल. धनवर्षा पॉलिसी अंतर्गत ग्राहकाला दोन पॉलिसी टर्म निवडण्याची संधी मिळते. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार 10 किंवा 15 वर्ष मुदतीच्या पॉलिसीची निवड करू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एलआयसी प्रीमियम रकमेवर गॅरेटेंड एडीशनचा लाभ देते. ग्राहकाला प्रती एक हजार रुपये जमा केल्यावर त्या रकमेवर 75 रुपयांची गॅरेटेंड एडीशन अर्थात हमी मिळते. या पॉलिसीत दोन पर्याय ग्राहकांना देण्यात आले आहेत. ग्राहक त्यांची गरज आणि सोयीनुसार यापैकी एक पर्याय निवडू शकतो. जर एखादी व्यक्ती या पॉलिसीत 8,34,642 रुपये गुंतवत असेल तर त्याची मूळ विमा रक्कम 10,00,000 रुपये होईल. तसेच त्याच्या मृत्यूवेळी ही विमा रक्कम 79,87,000 रुपये असेल. या योजनेंतर्गत पॉलिसीच्या कालवधी दरम्यान कोणत्याही वेळी पॉलिसीला तीन महिने पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच पॉलिसी जारी केलेल्या तारखेपासून तीन महिन्यांनंतर किंवा फ्री-लूक पीरियड संपल्यानंतर जो कोणता कालावधी असेल तेव्हा त्यावर तुम्ही कर्ज घेऊ शकता. समजा तुमचं वय 30 वर्ष आहे आणि तुम्ही एलआयसीच्या धनवर्षा पॉलिसी तर गुंतवणूक करत एकरकमी प्रिमीयम म्हणून 8,86,750 रुपये रक्कम भरली तर तुमची विमा रक्कम 11,08,438 रुपये होईल. तसेच मूळ खात्रीशीर एकूण विमा रक्कम 10 लाख रुपये होईल. जर तुमच्या पॉलिसीचा कालावधी 15 वर्षाचा असेल तर ती मॅच्युअर झाल्यावर 21,25,000 रुपये तसेच पहिल्या वर्षादरम्यान मृत्यू झाल्यास किमान 11,83,438 रुपये आणि पॉलिसी कालवधीच्या 15 व्या वर्षी मृत्यू झाल्यास 22,33,438 रुपये तुम्हाला मिळतील. एलआयसीच्या धनवर्षा पॉलिसीत ग्राहकास एकूण विमा रक्कम निवडण्याचा अधिकार मिळतो. प्रीमियम रकमेच्या 10 पटीपर्यंत विमा रक्कम निवडता येऊ शकते. याचाच अर्थ जर तुम्ही या पॉलिसीसाठी 50 हजार रुपयांचा प्रिमीयम निवडला तर तुम्ही पाच लाख रुपयांच्या विमा रकमेची पॉलिसी घेऊ शकता. ही पॉलिसी नॉन लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक, बचत आणि जीवन विमा योजना आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या