नॉर्मल आणि पॉवर पेट्रोलमध्ये फरक काय? किंमतीत तफावत का?
मुंबई, 8 जून : तुम्ही पेट्रोल भरण्यासाठी पंपावर जाता तेव्हा तेथे अनेक प्रकारचे पेट्रोल उपलब्ध असतात. या पेट्रोलच्या किमतीही वेगवेगळ्या असतात. आता प्रश्न असा आहे की या पेट्रोलमध्ये काय फरक आहे आणि त्यांचा वाहनावर कसा परिणाम होतो. अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की प्रीमियम पेट्रोलमध्ये एवढं काय वेगळं आहे की त्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतात. आज आम्ही तुम्हाला नॉर्मल पेट्रोल आणि पॉवर पेट्रोलमध्ये काय फरक आहे हे सांगणार आहोत.
भारतात साधारणपणे तीन प्रकारचे पेट्रोल उपलब्ध आहे. एक सामान्य पेट्रोल आणि दुसरे प्रीमियम पेट्रोल म्हणजे पॉवर पेट्रोल. याशिवाय हाय ऑक्टेन पेट्रोलही आहे. प्रीमियम पेट्रोलला पॉवर, स्पीड आणि एक्स्ट्रा माईल, हाय स्पीड या नावांनी ओळखले जाते. प्रत्येक कंपनीच्या आधारे ही नावे वेगवेगळी ठरवली जातात. अशा वेळी जाणून घ्या त्यांच्यात काय फरक आहे आणि त्याचा कारवर काय परिणाम होतो…
नॉर्मल आणि पॉवर पेट्रोलबद्दल बोललो तर एक प्रकारे पॉवर पेट्रोल हे प्रीमियम पेट्रोल आहे आणि दुसरे सामान्य पेट्रोल असतं. या दोन पेट्रोलमधील मुख्य फरक म्हणजे प्रिमियम किंवा पॉवर पेट्रोलमध्ये ऑक्टेनचे प्रमाण खूप जास्त असते. पेट्रोल पंपावर उपलब्ध असलेले पेट्रोलचे विविध प्रकार ऑक्टेनच्या प्रमाणानुसार विभागले जातात. जर आपण नॉर्मल पेट्रोलबद्दल बोललो, तर त्यातील ऑक्टेन रेटिंग 87 पर्यंत आहे, तर मिड ग्रेड पेट्रोलमध्ये, हे प्रमाण 88 ते 90 पर्यंत आहे. तर सर्वात चांगलं जे पेट्रोल असतं त्यामध्ये 91 ते 94 पर्यंत ऑक्टाइन रेटिंग असते.
Driving Rule: भारतात लेफ्ट साइड तर विदेशांत राइट साइडने का करतात ड्रायव्हिंग? मजेदार आहे कारणज्या पेट्रोलमध्ये ऑक्टेन जास्त असते, ते इंजिनमधील इंजिन नॉकिंग आणि डिटोनेटिंग कमी करते. इंजिन नॉकिंग आणि डिटोनेटिंग या मॅकेनिकल टर्म आहेत. ज्या इंजिनचा आवाज नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जातात. बरं, असे नाही की हाय ऑक्टेन पेट्रोल प्रत्येक वाहनात फायदेशीर आहे. हे त्या वाहनांसाठी फायदेशीर आहे, ज्यात हाय कॉम्प्रेशन सिस्टम असते. ऑक्टेन इंजिनला पूर्ण क्षमतेने काम करण्यास मदत करते, ज्यामुळे वाहन मालकाला खूप फायदा होतो. यासाठी, तुम्हाला ते दीर्घकाळ सतत वापरावे लागेल.
Airplane Facts: विमानाला हॉर्न असतं का? ते कसं काम करतं? इंट्रेस्टिंग आहे फॅक्टप्रीमियम फ्लूलच्या फायद्यांविषयी बोलायचं झालं तर यामुळे फ्यूल इकॉनॉमीमध्ये वाढ होते. यामुळे इंजिन चांगले काम करते आणि इंजिनला जास्त फ्यूल लागत नाही. तसेच, त्याचा गाडीच्या स्पीडवर आणि पॉवरवर याचा परिणाम होतो. ज्यावेळी तुम्ही पॉवर पेट्रोल वापरता तेव्हा ते थेट इंजिनचे नॉक कमी करते आणि इंधनाच्या शक्तीचा वाहनाच्या शक्तीवर परिणाम होतो.