चेक बाउंस रुल
Cheque Bounce Rules: सध्याच्या काळात ऑनलाइन ट्रांझेक्शन झपाट्याने वाढतेय. मात्र अनेक लोक आजही चेकने पेमेंट करणे पसंत करतात. यासोबतच आजही मोठ्या व्यवहारांसाठी चेकचाच वापर केला जातो. अशा वेळी तुम्ही चेकने पेमेंट करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं असतं. एकाही चुकीमुळे तुमचा चेक बाउंस होऊ शकते. चेक बाउंस झाल्यास तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो. काही वेळा तर तुरुंगातही जावं लागू शकते. तुम्हीही चेकबुकचा वापर करत असाल तर तुम्ही काही नियम जाणून घेणं गरजेचं आहे.
अकाउंटमध्ये बॅलेन्स नसणे किंवा कमी असणे, सिग्नेचर बदलणे, शब्द लिहिण्यामध्ये चूक होणे, अकाउंट नंबर चुकीचा टाकणे. ओव्हरराईट करणे इत्यादी अनेक कारणांमुळे चेक बाऊन्स होतात. यासोबतच कालमर्यादा संपणे, चेकर्सचे खाते बंद होणे, चेकवर कंपनीचा शिक्का नसणे, ओव्हरड्राफ्ट मर्यादा लिमिट पार करणे अशा अनेक कारणांमुळे चेक बाऊन्स होऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीत चेक बाऊन्स झाल्यास बँक त्याचा दंड तुमच्या खात्यातूनच कापून घेते. चेक बाऊन्स झाल्यावर, कर्जदाराला बँकेला कळवावे लागते. त्यानंतर त्या व्यक्तीला एका महिन्याच्या आत पैसे भरावे लागतात.
Railway Track Stones: रेल्वे ट्रॅकवर का असतात टोकदार दगडं? जाणून घ्या रोचक तथ्यचेक बाउंस झाल्यास बँका त्यांच्या ग्राहकांकडून दंड वसूल करतात. हा दंड वेगवेगळ्या कारणांनुसार वेगवेगळा असू शकतो. हे चार्जेस वेगवेगळ्या बँकांसाठी वेगवेगळे असतात. हा दंड 150 ते 750 रुपये किंवा 800 रुपयांपर्यंत असू शकतो. संबंधित व्यक्तीला 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा चेकच्या दुप्पट रकमेचा दंड किंवा दोन्हीही होऊ शकतात. जेव्हा चेक देणाऱ्याच्या खात्यात पुरेसे बॅलेन्स नसते आणि बँक चेकला डिसऑनर करते त्याच वेळी ही शिक्षा होते.
चेक बाउंस होणे हा भारतात गुन्हा मानला जातो. नियमांनुसार, चेक बाउंस झाल्यानंतर एक महिन्याच्या आत कर्जदार धनादेश भरू शकला नाही, तर त्याच्या नावावर कायदेशीर नोटीस बजावली जाऊ शकते. त्यानंतर 15 दिवसांत या नोटीसचे उत्तर मिळाले नाही, तर अशा व्यक्तीविरुद्ध ‘Negotiable Instrument Act 1881’ च्या कलम 138 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो. कर्जदारावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला दंड देखील लावला जाऊ शकतो. यासोबतच त्याला दोन वर्षांचा तुरुंगवास होण्याचीही शक्यता असते.