JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / POST OFFICE हे काम आजच करा पूर्ण, मिनिमम बॅलन्स नसल्यास खात्यातून कापले जाणार पैसे

POST OFFICE हे काम आजच करा पूर्ण, मिनिमम बॅलन्स नसल्यास खात्यातून कापले जाणार पैसे

जर तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असेल तर हा नवीन नियम तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. तुमच्या बचत खात्यामध्ये आज 11 डिसेंबर रोजी मिनिमम बॅलन्स जमा करणं आवश्यक आहे. अन्यथा उद्यापासून तुम्हाला मेंटेनन्स शुल्क द्यावं लागेल

0107

पोस्ट ऑफिसमध्ये मिनिमम बॅलन्स जमा करण्याची डेडलाइन आज 11 डिसेंबर 2020 ही आहे. तुम्हाला पोस्टाच्या बचत खात्यात आजच 500 रुपये मिनिमम बॅलन्स जमा करावा लागेल. असे न केल्यास उद्यापासून 100 रुपये शुल्क कापले जाईल आणि तुमची शिल्लक रक्कम शुन्य होईल ज्यामुळे खाते बंद होऊ शकते.

जाहिरात
0207

याआधी इंडिया पोस्टने त्यांच्या ग्राहकांना याबाबत आठवण करून देणारा मेसेज देखील पाठवला होता. पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स असणं अनिवार्य आहे, असं या मेसेजमधून सांगण्यात आलं होतं. जर तुम्हाला मेंटेनन्स चार्ज द्यायचा नसेल तर आज तुमच्या खात्यामध्ये कमीतकमी 500 रुपये जरुर मेंटेन करा.

जाहिरात
0307

इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार, व्यक्तिगत किंवा संयुक्त स्वरुपात पोस्ट ऑफिसमध्ये बचत खात्यासाठी सध्या 4 टक्के दराने व्याज मिळते आहे. या खात्यावर मिळणारे व्याज महिन्याची 10 तारीख आणि शेवटची तारीख या दरम्यान असणाऱ्या शिल्लक रकमेच्या (Minimum Balance) आधारावर निश्चित केलं जातं

जाहिरात
0407

जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही बचत खाते उघडू शकता. यामध्ये तुम्ही सिंगल किंवा जॉइंट खातं उघडू शकता. जॉइंट खातं दोन प्रौढ किंवा एक प्रौढ आणि एक अल्पवयीन अशा व्यक्तींच्या नावे उघडू शकता.

जाहिरात
0507

एका व्यक्तीला केवळ एकच बचत खाते उघडता येईल. पोस्टात बचत खाते उघडण्यासाठी नॉमिनी आवश्यक आहे.

जाहिरात
0607

तुम्हाला जर मेंटेनन्स चार्ज देणं टाळायचं असेल तर आजच तुमच्या खात्यामध्ये 500 रुपये शुल्क जमा करा. इंडिया पोस्टच्या वेबसाइटवर याविषयी माहिती देण्यात आली आहे.

जाहिरात
0707

पोस्टाच्या विविध योजनांबाबत, सुविधांबाबत किंवा नियमात झालेल्या बदलांबाबत नेहमी अपडेट राहण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसचं ट्विटर पेज फॉलो करू शकता. यामध्ये विविध अपडेट्सबाबत तुम्हाला माहिती मिळेल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या