JOIN US
मराठी बातम्या / मनी / बँकेशी संबंधित 'हे' नियम 1 ऑगस्टपासून बदलणार, तुमच्या खिशावर कसा फरक पडेल?

बँकेशी संबंधित 'हे' नियम 1 ऑगस्टपासून बदलणार, तुमच्या खिशावर कसा फरक पडेल?

ऑगस्ट महिन्यात बँकिंग व्यवस्थेशी संबंधित अनेक नियम आणि बँक-एटीएमशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत.

जाहिरात

कोणती पोस्ट सर्वोत्तम?

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जुलै : महिना बदलला की अर्थविषयक अनेक गोष्टींमध्ये पहिल्या तारखेपासून काही बदल होतात. हे बदल तुमच्या आमच्याशी संबंधित असतात. त्यामुळे त्याचा आपल्यावर परिणाम होतो. म्हणून या बदलेल्या नियमांची आपल्या सर्वांना माहिती असणे गरजेचं असतं. जुलै महिना संपण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात कोणते नवे नियम लागू होणार किंवा कोणते नियम बदलणार यावर एक नजर टाकुया. ऑगस्ट महिन्यात बँकिंग व्यवस्थेशी संबंधित अनेक नियम आणि बँक-एटीएमशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. या बदलामुळे तुम्हालाही काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. Money Mantra: मोठे आर्थिक व्यवहार करणार आहात? जरा थांबा; आर्थिकदृष्टया 26 जुलैचा दिवस असा असेल बँक ऑफ बडोदाचा 1 ऑगस्टपासून ‘हा’ नियम बदलणार चेक क्लिअरन्सबाबत RBI च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून बँक ऑफ बडोदाने चेक पेमेंट नियमांमध्ये काही बदल केले आहेत. बँकेने आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की 1 ऑगस्टपासून 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकच्या पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम अनिवार्य असेल. याशिवाय पेमेंट केले जाणार नाही. Share Market Fraud : हो म्हटल्यामुळे लाखोंचा फटका, पुण्यातल्या नवविवाहित दाम्पत्याची शेअर ब्रोकरकडून फसवणूक ****पॉझिटिव्ह पेस सिस्टम काय आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंग फसवणूक टाळण्यासाठी 2020 मध्ये चेकसाठी ‘पॉझिटिव्ह पे सिस्टम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या सिस्टमअंतर्गत, चेकद्वारे 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरण्यासाठी काही महत्त्वाची माहिती आवश्यक असू शकते. या सिस्टमद्वारे चेकची माहिती मेसेज, मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएमद्वारे दिली जाऊ शकते. चेकचे पेमेंट करण्यापूर्वी हे तपशील तपासले जातात. ऑगस्टमध्ये 13 दिवस बँका बंद राहतील ऑगस्ट महिन्यात सण आणि सुट्ट्यांमुळे बँका 13 दिवस बंद राहणार आहेत. स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि गणेश चतुर्थी सारखे मोठे सण या महिन्यात आहेत. त्यामुळे ऑगस्टमध्ये बँकेशी संबंधित काही काम असेल, तर सुट्टीच्या दिवशी नक्की पाहा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या