ALERT: ITR दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस, 15 मिनिटांत स्वत:च भरा आयटीआर अन् टाळा दंड
मुंबई, 31 जुलै : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची आज शेवटची तारीख आहे. आज नंतर ITR दाखल केल्यास दंड आकारला जाईल. त्यामुळे तुम्ही अद्याप हे काम पूर्ण केलं नसेल तर ते करा. आयकर विभाग सातत्यानं करदात्यांना वेळेवर आयटीआर भरण्यास सांगत आहे. आयकर विभागानं स्पष्टपणं सांगितलं आहे की, आयटीआर भरण्याची तारीख वाढवली जाणार नाही. 31 जुलैनंतर आयटीआर दाखल करणाऱ्यांना दंड भरावा लागेल. जर तुम्ही अजून तुमचा ITR दाखल केला नसेल, तर तुम्ही काही मिनिटांत या गोष्टी सहज करू शकता. त्यासाठी आवश्यक कागदपत्रं सोबत ठेवावी लागतील. अलीकडच्या काळात आयटीआर भरणं खूप सोपं झालं आहे. जर तुमच्याकडं त्याच्याशी संबंधित सर्व कागदपत्रं उपलब्ध असतील, तर तुम्हाला ITR दाखल करण्यासाठी फक्त 15 मिनिटं लागतील. फॉर्म 16 किंवा 16A, 26AS, वार्षिक माहिती विवरण (AIS), भांडवली नफ्याच्या विवरणामध्ये TDS चे स्टेटमेंट इत्यादी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत जी तुम्हाला ITR भरताना आवश्यक असतील. कारण त्यामध्ये तुमच्या उत्पन्नाची सर्व माहिती असते. याशिवाय तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, गुंतवणुकीचे तपशील आणि बँक खात्याचे तपशील द्यावे लागतील. हेही वाचा- बँक ऑफ बडोदाकडून उद्यापासून महत्त्वाचा नियम लागू; ग्राहकांना काय करावं लागणार? स्वतःच ITR फाईल करा-
उशीरा केल्यास होईल दंड- शनिवारी रात्री 8:36 वाजेपर्यंत 5 कोटींहून अधिक लोकांनी आयटीआर भरले आहेत. आयकर विभागानं म्हटलं आहे की मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी ITR भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. दंड टाळण्यासाठी, शेवटच्या तारखेपर्यंत तुमचा ITR फाइल करा. डेडलाइन वाढणार नाही- इन्कम टॅक्स इंडियाने स्पष्ट केलं आहे की 31 जुलैपर्यंत आयटीआर फाइल करा आणि उशीरा दंड टाळा. म्हणजेच 1 ऑगस्टपासून आयटीआर भरण्यासाठी दंड भरावा लागणार आहे. तुमचा रिटर्न वेळेवर भरून तुम्ही हे टाळू शकता. अंतिम मुदतीनंतर ITR दाखल केल्यास दंड आकारला जाऊ शकतो. अंतिम मुदतीनंतर रिटर्न भरण्यासाठी, 5 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्नावर 1,000 रुपये विलंब शुल्क आकारले जाईल. 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नासाठी विलंब शुल्क 5,000 रुपये असेल. ही रक्कम 10,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते.