राजस्थान टूर पॅकेज
मुंबई, 16 जुलै : IRCTC ने पर्यटकांसाठी खास रॉयल राजस्थान टूर पॅकेज सादर केले आहे. हे टूर पॅकेज 11 रात्री आणि 12 दिवसांसाठी आहे. या टूर पॅकेजमध्ये पर्यटक भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने प्रवास करतील. IRCTC ने एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत हे टूर पॅकेज सादर केले आहे. विशेष म्हणजे, IRCTC प्रवाशांच्या सोयीसाठी देश आणि परदेशातील अनेक टूर पॅकेजेस ऑफर करत आहे. या टूर पॅकेजेसच्या माध्यमातून पर्यटनालाही चालना मिळते आणि पर्यटकांना विविध पर्यटन स्थळांना स्वस्तात भेटी देता येतात. यासोबतच पैसेही कमी लागतात. हे टूर पॅकेज कधी सुरु होईल आणि डेस्टिनेशंस कोणते असतील? आयआरसीटीसीचे हे टूर पॅकेज ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. हे टूर पॅकेज 20 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना राजस्थानच्या आठ ठिकाणी नेण्यात येणार आहे. टूर पॅकेजमध्ये पर्यटक राजस्थानमधील उदयपूर, अजमेर, चित्तोडगड, अबू रोड, जोधपूर, जैसलमेर, बिकानेर आणि जयपूरला भेट देतील. हे टूर पॅकेज कोलकाता येथून सुरू होणार आहे. IRCTC चं खास टूर पॅकेज! फिरुन या हरिद्वार, वैष्णो देवी आणि गोल्डन टेम्पल टूर पॅकेजचे बोर्डिंग आणि डिबोर्डिंग पॉइंट्स कोणते? IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये पर्यटक कोलकाता, बंदेल जंक्शन, वर्धमान, दुर्गापूर, आसनसोल, धनबाद, गमोह, हजारीबाग रोझ, कोडराम, गया, डेहरी ऑन सोन आणि डीडी उपाध्याय जंक्शन येथून चढू आणि उतरू शकतील. या टूर पॅकेजमध्ये एकूण 790 जागा आहेत. या जागांपैकी SL साठी 580 आणि 3AC साठी 210 जागा आहेत. IRCTC चं जबरदस्त टूर पॅकेज! कमी पैशांत फिरुन या अंदमान IRCTC च्या या टूर पॅकेजचे भाडे किती? IRCTC च्या या टूर पॅकेजचे भाडे वेगवेगळ्या कॅटेगिरीसाठी वेगळे आहे. तुम्ही इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 20,650 रुपये मोजावे लागतील. दुसरीकडे, जर तुम्ही स्टँडर्ड क्लासमध्ये प्रवास केला तर तुम्हाला प्रति व्यक्ती भाडे 30,960 रुपये द्यावे लागेल. जर तुम्ही कंफर्ट क्लासमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला 34,110 रुपये भाडे द्यावे लागेल. आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजमध्ये इतर टूर पॅकेजप्रमाणेच प्रवाशांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मोफत असेल. अजमेरमधील या टूर पॅकेजमध्ये अजमेर शरीफ दर्गा, ब्रह्मा मंदिर आणि पुष्कर तलावाला भेट दिली जाणार आहे. उदयपूरमध्ये पर्यटकांना सिटी प्लेस, फतेह सागर तलाव आणि सहेलियों की बाओरी येथे नेले जाईल. त्याचप्रमाणे चित्तौडगडमध्ये पर्यटकांना चित्तौडगड किल्ला पाहायला मिळणार आहे.