JOIN US
मराठी बातम्या / मनी / Investment Tips: रिटायरमेंटपूर्वी व्हाल करोडपती, गुंतवणूकीचा 'हा' पर्याय ठरेल एकदम BEST

Investment Tips: रिटायरमेंटपूर्वी व्हाल करोडपती, गुंतवणूकीचा 'हा' पर्याय ठरेल एकदम BEST

म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा अलीकडच्या काळात गुंतवणूकीसाठी एक चांगला पर्याय मानला जात आहे. जर एखाद्या व्यक्तीनं वयाच्या 21 व्या वर्षापासून म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये (SIP) दीर्घमुदतीकरिता काही रक्कम गुंतवण्यास सुरवात केली तर वयाच्या 50 वर्षापर्यंत म्हणजे रिटायरमेंटपूर्वीच ती व्यक्ती अगदी सहज करोडपती (Crorepati) होऊ शकते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी: सध्याच्या काळात गुंतवणुकीचे (Investment Option) अनेक पर्याय उपलब्ध आहेत. एका ठराविक वयोमानानंतर किंवा निवृत्तीनंतर जवळ पुरेसे पैसे असावेत, या विचारातून अनेक लोक गुंतवणुकीला सुरुवात करतात. नोकरी किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या मासिक उत्पन्नातील काही रक्कम गुंतवणूकीसाठी वापरण्याकडे बहुतांश लोकांचा कल असतो. अर्थात याचे खूप सारे फायदे देखील आहेत. म्युच्युअल फंड (Mutual Fund investment) हा अलीकडच्या काळात गुंतवणूकीसाठी एक चांगला पर्याय मानला जात आहे. जर एखाद्या व्यक्तीनं वयाच्या 21 व्या वर्षापासून म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये (SIP) दीर्घमुदतीकरिता काही रक्कम गुंतवण्यास सुरवात केली तर वयाच्या 50 वर्षापर्यंत म्हणजे रिटायरमेंटपूर्वीच ती व्यक्ती अगदी सहज करोडपती होऊ शकते. गेल्या काही वर्षापासून म्युच्युअल फंड एसआयपीवर गुंतवणूकदारांचा विश्वास कायम असल्याचं चित्र आहे. जानेवारी 2022 मध्ये त्यात थोडीशी घट झाल्याचं दिसत असलं तरी आपण जर डिसेंबर 2021 मधली एसआयपी योगदानाची आकडेवारी पाहिली तर ती विक्रमी 11,035 कोटी रुपये होती. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये यात थोडीशी घट होईल. पण मार्च महिन्यात पुन्हा एकदा त्यात विक्रमी वाढ होईल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. AMFI चा देखील अंदाज असाच आहे. हे वाचा- Cryptocurrency च्या मार्केट कॅपमध्ये घसरण; मात्र Bitcoin, Ethereum मध्ये उसळी AMFI च्या म्हणण्यानुसार, एसआयपी ही सर्वोत्तम गुंतवणूक म्हणून लोकांच्या पसंतीस उतरत आहे. डिसेंबर 2021 मध्ये एसआयपी योगदान विक्रमी 11,035 कोटी रुपये होते. नोव्हेंबरमध्ये हा आकडा 11,005 कोटी रुपये होता. जानेवारी 2022 मधली आकडेवारी अजून येणं बाकी असलं तरी त्यात थोडीशी घट अपेक्षित आहे. आकडेवारीनुसार, सलग 10 व्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये (Mutual Fund Schemes) गुंतवणूक वाढल्याचं दिसतं. डिसेंबरमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात 25,076.71 कोटी रुपयांचा नेट इनफ्लो राहिला आहे. बीएनपी फिनकॅपचे अध्यक्ष ए. के. निगम यांनी सांगितलं की, ‘एसआयपी हा गुंतवणुकीचा पद्धतशीर प्रकार आहे. दीर्घ कालावधीसाठी असे अनेक फंड आहेत की ज्यांचा वार्षिक एसआयपी परतावा 12 टक्के आहे. गुंतवणूकदार थेट मार्केटमधील जोखमीच्या कक्षेत येत नाहीत, हा एसआयपीचा सर्वात मोठा फायदा म्हणावा लागेल. पारंपारिक उत्पादनांच्या तुलनेत मिळणारे रिटर्न्स देखील (Returns) अधिक असतात’. हे वाचा- तीन महिन्यात 50 हजारांची गुंतवणूक 10 लाखांवर; ‘या’ शेअरमुळे छप्परफाड कमाई! कसे व्हाल करोडपती? दीर्घ मुदतीसाठी ‘एसआयपी’मध्ये चक्रवाढीचा लाभ मिळतो. तुम्ही यात अगदी 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. जर एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या 21 व्या वर्षापासून दररोज 100 रुपयांची ‘एसआयपी’मध्ये बचत केली तर तो त्याच्या रिटायरमेंटपूर्वी करोडपती होऊ शकतो. याचा अर्थ 60 वर्षापूर्वी 10 वर्ष म्हणजेच वयाच्या 50 व्या वर्षी कोट्यवधी रुपयांचा फंड तयार करणं शक्य आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष केवळ रिटर्नवर नाही तर रिस्क अॅडजेस्टेड रिटर्नवरही असते. यासाठी एसआयपी हा सर्वोत्तम पर्याय आहे, असं तज्ज्ञ सांगतात. उदाहरणार्थ, वयाच्या 21 व्या वर्षापासून रोज 100 रुपयांची बचत केल्यास महिन्याच्या हिशोबानुसार 3000 रुपये ‘एसआयपी’मध्ये गुंतवावे लागतात. अंदाजानुसार यासाठी वार्षिक रिटर्न 12 टक्के असेल. जर तुम्ही पुढील 30 वर्षांसाठी म्हणजेच वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत गुंतवणूक केली तर तुम्ही 1.1 कोटी रुपयांचा फंड तयार करू शकाल. यात तुमची एकूण गुंतवणूक 10.8 लाख रुपये असेल, तर तुमची 95.1 लाखांनी वेल्थ गेन होईल. म्युच्युअल फंडाच्या अशा अनेक दीर्घकालीन स्किम्स आहेत की ज्यांचे वार्षिक रिटर्न 12 टक्के सीएजीआर (CAGR) आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या