मुंबई, 3 एप्रिल : गुंतवणूक आणि बचतीबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढली आहे. बँक एफडीच्या पलिकडे लोक आता गुंतवणुकीसाठी विविध पर्यात शोधत आहेत. मात्र कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा ही प्रत्येक गुंतवणूकदाराची इच्छा असते आणि त्या गुंतवणुकीत बाजारातील जोखीमही कमी असावी. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक करुन तुम्ही देखील जास्तीत जास्त परतावा मिळवू शकता अशा योजनांची माहिती घेऊयात. बँक FD मध्ये गुंतवणूक करा लोक सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून बँकेतील एफडीचा (Bank FD) विचार करतात. तुम्ही बँकांमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर मुदत ठेवी (Fixed Deposit) हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक बँकांनी त्यांचे एफडी व्याजदर बदलले आहेत. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बँकेसह अनेक बँकांचा समावेश आहे. या बँक एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना अधिक लाभ मिळतात. मुलीचं भविष्य करा सुरक्षित; केवळ 250 रुपयांपासून करा सुरुवात आणि मिळवा लाखो रुपये पोस्ट ऑफिस RD मध्ये गुंतवणूक करा पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या बचत योजना पर्यायांबद्दल सांगत असते. त्यापैकी एक सुरक्षित आणि उच्च परतावा गुंतवणुकीचा पर्याय पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिट अकाउंट आहे. या खात्यामध्ये तुम्ही फक्त 100 रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीत खाते उघडू शकता. पोस्ट RD मध्ये गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. तुम्ही एका वर्षात जमा केलेल्या रकमेच्या आधारावर तुम्हाला परतावा मिळेल. या योजनेवर पोस्ट ऑफिस खातेदारांना 5.8 टक्के व्याजदर देते. LIC प्रीमियम भरण्यासाठी ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घसबसल्या ऑनलाईन जमा करा; कसं? PPF मध्ये गुंतवणूक करा तुम्ही बचत खात्यातून दरमहा NPS आणि PPF खात्यांमध्ये पैसे गुंतवू शकता. ही एक सरकारी योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूकदाराला जास्त व्याज मिळते. PPF योजनेत गुंतवणुकीवर तुम्हाला 7.1 टक्के व्याजदर मिळतो. प्रत्येक महिन्याला सेव्हिंग ऑटो डेबिट पर्यायाद्वारे पीपीएफ योजनेत गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. या योजनेद्वारे, तुम्ही 10 वर्षांसाठी दरवर्षी किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. तुम्हाला या योजनेतील गुंतवणुकीवर आयकर कलम 80C द्वारे परतावा मिळेल.