JOIN US
मराठी बातम्या / मनी / शेअर बाजारात गुंतवणुकीवर 10 नाही तर 100 पट परतावा मिळेल; फक्त एक सुत्र पाळावं लागेल

शेअर बाजारात गुंतवणुकीवर 10 नाही तर 100 पट परतावा मिळेल; फक्त एक सुत्र पाळावं लागेल

Investment Tips : मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत छोट्या कंपन्यांसाठी 100-बॅगर बनणं खूप सोपं आहे. 30 टक्के मार्केट शेअर असलेल्या कंपनीच्या तुलनेत 2 टक्के मार्केट शेअर असलेल्या कंपनीसाठी तिचा मार्केट शेअर दुप्पट, तिप्पट करणं खूप सोपं आहे.

जाहिरात

'या' शेअर्सनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; पुढे काय होणार? वाचा तज्ज्ञांचं मत

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जुलै : सध्याच्या काळात शेअर बाजार (Share Market) हा गुंतवणुकीचा (Investment) एक महत्त्वाचा पर्याय मानला जातो. शेअर बाजारात गुंतवणूक करणं जोखमीचं असलं तरी त्यातून मिळणारा परतावा जास्त असतो. त्यामुळे काही लोक ही जोखीम पत्करतात. काही लोक शेअर बाजारात पैसा दुप्पट व्हावा, या विचारानं गुंतवणूक करतात. याला मल्टिबॅगर रिटर्न (Multibagger Return) असं म्हणतात. आज बाजारात अनेक मल्टिबॅगर रिटर्न देणाऱ्या कंपन्या आहेत. पण मल्टिबॅगर रिटर्न व्यतिरिक्त अजून एक शब्द शेअर बाजारात ऐकायला मिळतो. दहापट बॅगर अर्थात 10 - बॅगर हा तो शब्द होय. याचा अर्थ ज्या शेअरमध्ये तुम्ही गुंतवणूक केली आहे, त्यातून दसपट परतावा मिळणं होय. 10- बॅगरपासूनच 100 -बॅगरकडे वाटचाल सुरू होते. 100 - बॅगर म्हणजे एखाद्या शेअरमध्ये गुंतवलेली रक्कम 100 पट होणं. 100- बॅगर ही टर्म काहीशी निराळी आहे. तसेच ती प्रदीर्घ काळाशी निगडीत आहे. परंतु, तुम्हीदेखील जोखीम पत्करून गुंतवणूक करत 100- बॅगर परतावा मिळवू शकता. मात्र त्यासाठी काही कालावधीपर्यंत प्रतीक्षा करणं आवश्यक असतं. तसंच यासाठी खास नियोजनही आवश्यक आहे. `नवभारत टाईम्स`ने या विषयीची माहिती दिली आहे. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यानंतर 10 - बॅगर म्हणजेच दसपट (Decuple) परतावा मिळणं ही तशी सर्वसामान्य बाब आहे. पण या गुंतवणूकीतून 100 - बॅगर अर्थात शंभरपट परतावादेखील मिळू शकतो. देशात इन्फोसिस, टायटन, एचडीएफसी बॅंक, एशियन पेंट्ससारखे अनेक शेअर आहेत, ज्यात गुंतवणुकीची रक्कम 100 पट झाली आहे. मात्र यासाठी खूप काळ लागतो. 1979 मध्ये बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 100 रुपये बेस वरून सुरू झाला होता. तो फेब्रुवारी 2006 मध्ये 10,000 अंकावर पोहचला आणि पहिल्यांदा 100 - बॅगर ठरला. गुंतवणुकीतून अशाप्रकारे फायदा मिळवण्यासाठी काही खास नियोजनाची गरज असते. गुंतवणकीतून 100 पट फायदा मिळण्यासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टी विचारात घेणं गरजेचं असतं. `ख्रिस्तोफर मेयर`ने केलेल्या एका संशोधनाच्या निष्कर्षानुसार, एका कंपनीला 100 बॅगर बनण्यासाठी सरासरी 26 वर्षं लागतात. याचा अर्थ असा की जरी तुम्ही गुंतवणूक कमी वयात सुरू केली तरी पहिला 100 बॅगर तुम्ही वयाच्या चाळिशी किंवा पन्नाशीत पाहू शकता. यासाठी धीर आणि प्रतीक्षा हे फॅक्टर महत्त्वपूर्ण ठरतात. या संपूर्ण कालावधीत गुंतवणूकदाराला खूप चढ-उताराचाही सामना करावा लागू शकतो. याबाबत अ‍ॅपलचं (Apple) उदाहरण बोलकं आहे. मार्केट कॅपिटलायझेशननुसार, अ‍ॅपल ही जगातली सर्वांत मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. पण गेल्या 20 वर्षांत अ‍ॅपलला अनेक चढ- उतारांचा सामना करावा लागला. यात अ‍ॅपलचा स्टॉक (Stock) 40 टक्क्यांच्या चार वेगवेगळ्या घसरणींमधून गेला आहे. नेटफ्लिक्सचं (Netflix) उदाहरण असंच काहीसं आहे. या कंपनीनं एका दिवसात आपलं मूल्य 25 टक्क्यांनी गमावलं होतं. केवळ एकदाच नाही तर असा प्रकार चार वेळा घडला आहे. त्यामुळे दमदार परतावा मिळावा, यासाठी शेअर निवडल्यावर गुंतवणूकदारांनी दीर्घ प्रतीक्षा करणं आवश्यक आहे. अत्यंत कमी कालावधीत एक पटीचं रुपांतर शंभर पटीत व्हावं, असं आपल्याला नेहमी वाटतं. असा विचार आपण शेअर आणि परताव्याच्या बाबतीतही करतो. मात्र यासाठी 1× (1+ r%) ^t=100 हे सूत्र वापरलं पाहिजे. या सूत्रात r म्हणजे वार्षिक परतावा (Annual Return) आणि t म्हणजे वर्ष होय. गुंतवणूकदार हे सूत्र अनेक प्रकारे वापरू शकतात. उदाहरणार्थ, तुम्हाला 30 वर्षात एक लाख रुपयांतून एक कोटी रुपये मिळवायचे आहेत. यासाठी तुम्हाला 16.6 टक्के वार्षिक परतावा गरजेचा आहे. यासोबतच तुम्ही या सूत्राच्या आधारे एका विशिष्ट परताव्यावर तुमची रक्कम 100 पट होण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल हे देखील जाणून घेऊ शकता. जर तुम्हाला 12 टक्के परतावा मिळत असेल तर तुमचे एक लाख रुपये 40.6 वर्षात एक कोटी होतील. त्याचप्रमाणे, 15 टक्के वार्षिक परताव्यावर तुमची गुंतवणूक 100 पटीने वाढण्यासाठी 33 वर्षे लागतील. जर तुम्हाला 11 वर्षात आपले पैसे 100 पट करायचे असतील तर तुम्हाला दर वर्षी 50 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल अशा पद्धतीनं गुंतवणूक करावी लागेल. जी कंपनी सातत्यानं ग्रोथ (Growth) करत आहेत, त्याच कंपनीच्या शेअरमधून तुम्हाला मल्टी बॅगर रिटर्न मिळेल. ज्या कंपनीचा महसूल, उत्पन्न वाढत आहे, मार्जिनमध्ये वाढ होत आहे. बाजारातला हिस्सा वाढत आहे आणि कंपनीची प्रतिशेअर कमाई वाढत आहेत, अशा कंपनीचा शेअर घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तसेच शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, स्टॉकची किंमत त्याच्या दीर्घकालीन कमाईवर शेअरला फॉलो करत असते. त्यामुळे एखाद्या कंपनीचा ईपीएस वाढला तर त्या कंपनीच्या शेअरची किंमतही सातत्याने वाढते. यात केवळ ईपीएस (EPS) वाढणं पुरसं नसून, कमाईची किंमत वाढणं देखील आवश्यक आहे. प्राइस अर्निंग मल्टिपल किंवा पीई रेशोवरून (PE Ratio) शेअर किती महाग आहे, हे समजू शकत नाही. एखाद्याने एखाद्या स्टॉक किंवा क्षेत्राचा दीर्घ कालावधीसाठी अभ्यास केल्यास, ती कंपनी आणि क्षेत्र गुंतवणूकदारांसाठी किती मौल्यवान आहे हे समजू शकतं. पीई रेशो अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. कंपनीची कमाई क्षमता वाढणं सर्वात महत्त्वाचं आहे. हे सहसा वेगानं वाढणाऱ्या किंवा नवीन कंपन्यांच्या बाबतीत दिसून येतं. पीई मल्टिपलच्यावर जाण्याची शक्यता असलेल्या कंपन्या आणि क्षेत्र शोधा. मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत छोट्या कंपन्यांसाठी 100-बॅगर बनणं खूप सोपं आहे. 30 टक्के मार्केट शेअर असलेल्या कंपनीच्या तुलनेत 2 टक्के मार्केट शेअर असलेल्या कंपनीसाठी तिचा मार्केट शेअर दुप्पट, तिप्पट करणं खूप सोपं आहे. कंपनीच्या लो बेसमुळं हे शक्य आहे. याचाच अर्थ ज्या कंपन्यांचे एम-कॅप 5000 कोटींपेक्षा कमी किंवा कदाचित 3000 कोटीपेक्षा कमी आहेत, अशा कंपन्यांवर लक्ष केंद्रीत करा. यामुळे 100 - बॅगर मिळण्याची शक्यता वाढते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या