मुंबई, 16 सप्टेंबर : हल्लीच्या महागाईच्या जमान्यात मुलांच्या भविष्यासाठी आर्थिकदृष्ट्या तरतूद प्रत्येक आईवडिलांना करावी लागतेच. सोबत आपलं स्वत:चं रिटायर्डमेंट प्लॅनिंग करणंही जरुरीचं असतं. मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना हा चांगला पर्याय आहे. पण मुलाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला पुढील गुंतवणूक करावी लागेल. लाइफ इन्शुरन्स तुम्हाला तुमच्या मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाइफ इन्शुरन्स घ्यावा लागेल. बाजारात अनेक विमा प्लॅन्स आहेत. प्रत्येक पाॅलिसीवर मिळणारं रिटर्न पुरेसा नसतो. म्हणून लाइफ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्ससोबत इतर पर्यायांचा विचार तुम्हाला करायला हवा. ICICI बँक ग्राहकांना धक्का, आता ‘यासाठी’ द्यावे लागतील जास्त पैसे पब्लिक प्राॅव्हिडंट फंड (PPF) तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक केलीत तर फायदेशीर आहे. सुकन्या समृद्धी योजनेपेक्षा याचा व्याज दर कमी असला तरी PPF सुरक्षित आहे. तुम्ही वर्षाला जास्तीत जास्त दीड लाख रुपये यात गुंतवू शकता. यामुळे तुम्हाला करात फायदा मिळतोच. शिवाय पैसे सुरक्षितही राहतात. पेट्रोल-डिझेल महागच, ‘हे’ आहेत आजचे दर युलिप युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (ULIP) मार्केट लिंक्ड प्राॅडक्ट्स असतो. तो इतर अॅण्डाॅमेंट इन्शुरन्स प्लॅनच्या तुलनेत चांगले रिटर्न देतो. युलिपमधली गुंतवणूक पूर्ण टॅक्स फ्री असते. म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडात कमी कालावधीसाठी गुंतवणूक करणं जोखमीचं असतं. म्हणूनच ही गुंतवणूक जास्त काळाकरता करायला हवी. म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीचा उपयोग महागाईशी लढण्यासाठी होतो. यातली गुंतवणूक मुलांच्या पुढच्या भविष्यासाठी उपयोगी असते. त्यासाठी SIP करणं उत्तम पर्याय आहे. अर्थमंत्र्यांनी घर खरेदीसाठी केली मोठी घोषणा सुकन्या समृद्धी योजना सरकारही मुलींसाठी अनेक योजना राबवत असतं. त्यातलीच एक आहे सुकन्या समृद्धी योजना. या योजनेअंतर्गत तुमची मुलगी 10 वर्षांची किंवा त्याहून लहान असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तिच्या नावे खातं उघडू शकता. या खात्यातल्या पैशाचा उपयोग तुमची मुलगी 21 वर्षांची होईल, तेव्हा नक्की होणार. कसं उघडणार खातं? सुकन्या योजनेअंतर्गत तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि तिथे सुकन्या समृद्धी योजनेचा फाॅर्म घ्या. इंटरनेटवरही इंडिया पोस्टच्या वेबसाइटवरून तुम्ही फाॅर्म डाऊनलोड करू शकता. मुलीचा फोटो त्यावर लावून फाॅर्म भरून पोस्ट आॅफिसमध्ये द्या. फाॅर्म भरून त्यावर योग्य सही करा. तुमचा आयडी आणि घरच्या पत्त्याचं प्रूफ यांचे झेराॅक्स जोडा. आधारकार्ड असेल तर ते जोडा. मुलीचं बर्थ सर्टिफिकेट, तुमचे आणि मुलीचे पासपोर्ट साइज फोटो जोडा. तुम्ही सुकन्या समृद्धी योजना खातं बँकेत सुरू करू शकता. 14 वर्षांचा फायदा कोणीही व्यक्ती आपल्या 10 वर्षापर्यंतच्या मुलींच्या नावे अकाउंट उघडू शकतो. यात 14 वर्षच गुंतवणूक करता येते. तुम्ही तुमच्या 1 वर्षांच्या मुलीच्या नावे खातं उगडलंत तर तिच्या 15व्या वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता. यात तुम्ही 15 वर्ष ते 21 वर्षांमध्ये या अकाउंटमध्ये कसलीही गुंतवणूक न करता व्याज मिळवू शकता. या खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये एका वर्षासाठी गुंतवू शकता. 14 वर्षानंतर तुम्हाला मिळतील 40 लाख रुपये. त्यानंतर तुम्ही ते पैसे काढले नाहीत तर मुलगी 21 वर्षांची झाल्यावर 64.8 लाख रुपये मिळतील. बेशिस्तपणाच्या आरोपावर उदयनराजेंचं कॉलर स्टाईल उत्तर, पाहा VIDEO