JOIN US
मराठी बातम्या / मनी / Government Scheme: पैसाच पैसा! ‘या’ सरकारी योजनेत करा गुंतवणूक, मिळेल 41 लाखांचा लाभ

Government Scheme: पैसाच पैसा! ‘या’ सरकारी योजनेत करा गुंतवणूक, मिळेल 41 लाखांचा लाभ

Sukanya Samriddhi Yojana in Post Office: मोदी सरकारच्या कार्यकाळात काही सरकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यानं तुमचं किंवा तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित होऊ शकतं.

जाहिरात

sukanya samriddhi yojana

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 सप्टेंबर: मोदी सरकारच्या कार्यकाळात काही सरकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यानं तुमचं किंवा तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित होऊ शकतं. यापैकी पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना (SSY) हा एक चांगला पर्याय आहे. अल्पबचत योजनेतील ही सर्वाधिक व्याज देणारी योजना आहे. SSY ला PPF, FD, NSC, RD, मासिक उत्पन्न योजना किंवा टाइम डिपॉझिटपेक्षा चांगलं व्याज मिळत आहे. जर ही योजना नवजात शिशूच्या नावानं सुरू केली गेली आणि दरवर्षी जास्तीत जास्त पैसे त्यात जमा केले गेले, तर मॅच्युरिटीवेळी ही योजना 60 लाखांपेक्षा जास्त निधी मिळवून देऊ शकते. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याज दर वार्षिक 7.6 टक्के आहे. योजनेची मॅच्युरिटी 21 वर्षे आहे, परंतु पालकांना त्यात फक्त 14 वर्षे पैसे गुंतवावे लागतील. बाकी वर्षाममध्ये त्यामध्ये व्याज वाढतच राहतं. तुम्ही या योजनेत कितीही गुंतवणूक केली तरी मॅच्युरिटीवर परतावा 3 पट असेल. या योजनेद्वारे सध्याच्या व्याजदरांवर जास्तीत जास्त 63.50 लाख रुपये उभे केले जाऊ शकतात. SSY कॅल्क्युलेटर:

या सरकारी योजनेत गुंतवणूक कशी करता येईल? SSY अंतर्गत कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये खातं सुरू केलं जाऊ शकतं. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. यासोबतच मुलीचा जन्म दाखला असणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा की, हे खातं फक्त 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावावर उघडलं जाऊ शकतं. यासाठी पालकांचा आयडी प्रूफ देखील आवश्यक आहे. यामध्ये पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट यासारखी कोणतीही कागदपत्रे वापरली जाऊ शकतात. त्याचबरोबर पत्त्याच्या पुराव्यासाठी कागदपत्रेही सादर करावी लागणार आहेत. बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तुमचं खातं उघडलं जाईल. खातं उघडल्यानंतर खातेदाराला पासबुकही दिलं जातं. हेही वाचा:  20 लाख अ‍ॅडव्हान्स, 15 भाडे अन् नोकरीही; फक्त 650 रुपये भरुन मिळवा सर्वकाही, तुम्हालाही आलाय का मेसेज? SSY चे फायदे काय आहेत? सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत म्हणजेच SSY अंतर्गत गुंतवणूक केल्यास आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट मिळू शकते. जर मुलगी 18 वर्षांची झाली आणि तिला तिच्या अभ्यासासाठी किंवा तिच्या लग्नासाठी पैशांची गरज असेल तर तुम्ही ठेव रकमेच्या 50 टक्के रक्कम काढू शकता. योजनेत दरवर्षी किमान 250 रुपये जमा करता येतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या