JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / PPF मध्ये गुंतवणूक केल्यास कसा होईल नफा? जाणून घ्या 4 महत्त्वाचे फायदे

PPF मध्ये गुंतवणूक केल्यास कसा होईल नफा? जाणून घ्या 4 महत्त्वाचे फायदे

गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आजही एफडीला अधिक पसंती दिली जाते. बचत खाते हा देखील महत्त्वाचा आणि पारंपरिक पर्याय आहे. पण या दोन्हींपेक्षी PPF मध्ये गुंतवणूक अधिक फायद्याची आहे. जाणून घ्या का

0107

गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आजही एफडीला (Fixed Deposits) अधिक पसंती दिली जाते. बचत खाते (Saving Account) हा देखील महत्त्वाचा आणि पारंपरिक पर्याय आहे. पण या दोन्हींपेक्षी PPF मध्ये गुंतवणूक अधिक फायद्याची आहे. जाणून घ्या का

जाहिरात
0207

पीपीएफ अर्थात पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुमचे पैसे सुरक्षित तर राहतातच पण त्याचबरोबर कर सवलत देखील मिळते. PPF गुंतवणुकीला सरकारी संरक्षण आहे. यामुळे यामध्ये जोखीमही अजिबात नाही आहे.

जाहिरात
0307

जे लोकं सेल्फ एम्प्लॉइड आहेत किंवा ईपीएफओचा लाभ घेत नाहीत त्यांच्यासाठी हा गुंतवणुकीचा पर्याय चांगला आहे. बँकेमध्ये तुमचे पैसे डिपॉझिट करण्यापैक्षा यामध्ये पैसे गुंतवणे अधिक फायद्याचे आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) मध्ये जाऊन पीपीएफ खाते उघडू शकता. जाणून घ्या काय आहेत महत्त्वाची कारणं

जाहिरात
0407

व्याजदर- PPF मध्ये चांगल्या दराने व्याज मिळते. सध्या यामध्ये 7.1 टक्के दराने व्याज मिळते आहे, देशातील कोणतीच कमर्शिअल बँक एवढा जास्त व्याजदर देत नाही. स्टेट बँक ऑफ इंडियामध्येही एफडीवरील व्याजदर 5 ते 5.5 टक्के आहे. काही छोट्या फायनान्स बँकांमधील व्याजदराची तुलना PPF च्या व्याजदराशी केली जाऊ शकते. बँकेतील विविध गुंतवणुकीच्या पर्यायावर मिळणारे व्याज वार्षिक असते, पीपीएफमध्ये व्याज त्रैमासिक मिळते.

जाहिरात
0507

दोन प्रकारच्या टॅक्स सुविधा- पीपीएफमध्ये गुंतवणूक केली असल्यास आयकर कायदा सेक्शन 80 सी अंतर्गत कर सवलत मिळते. शिवाय व्याजातून मिळालेल्या उत्पन्नावर देखील सूट आहे.

जाहिरात
0607

लाँग टर्म कॉर्पस- पीपीएफ 15 वर्षाची स्कीम आहे ज्या माध्यमातून लाँग टर्म कॉर्पस अर्थात दीर्घकाळासाठी तुमची रक्कम असेल ज्याचा तुम्ही वापर करू शकता. या फंडमधून तुम्ही 5 वर्षांनी पैसे काढू शकता, मात्र यावर काही बंधनंही आहेत. अशामुळे गुंतवणूकदार दीर्घकाळासाठी पैसे वाचवू शकतात.

जाहिरात
0707

छोट्या रकमेची गुंतवणूक करण्याची सुविधा- तुम्ही पीपीएफ खात्यामध्ये कमीत कमी 500 रुपये वार्षिक गुंतवू शकता. जास्तीत जास्त 1 लाख 50 हजाराची तुम्हाला गुंतवणूक करता येईल. पीपीएफ खातेधारकाने जर एखाद्या आर्थिक वर्षामध्ये न्युनतम रक्कम अर्थात 500 रुपये खात्यामध्ये नाही भरले तर ते खाते स्थगित केले जाते. बंद पडलेले खाते पुन्हा सुरू करण्यासाठी अर्ज करावा लागेल. यासाठी 500 रुपयासह तुम्हाला 50 रुपये वार्षिक शुल्क द्यावे लागेल. प्रतिवर्षानुसार हे शुल्क निश्चित केले जाईल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या