JOIN US
मराठी बातम्या / मनी / Instant Loan : पर्सनल लोनसाठी आता बँकेत जायची गरज नाही; Google Pay वर झटपट मिळवा लोन

Instant Loan : पर्सनल लोनसाठी आता बँकेत जायची गरज नाही; Google Pay वर झटपट मिळवा लोन

Google Pay च्या ग्राहकांना DMI द्वारे दिलेली जास्तीत जास्त कर्जाची रक्कम 1 लाख रुपये असेल. तुम्ही ते जास्तीत जास्त 36 महिन्यांच्या हप्त्यांमध्ये परत करू शकता. ही भागीदारी देशभरात 15,000 पिन कोडवर सुरू करण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 फेब्रुवारी : आता तुम्हाला वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेण्यासाठी बँकांमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही Google Pay वापरत असल्यास, वैयक्तिक कर्ज (Google Pay Personal Loan) घेणे तुमच्यासाठी एक चुटकीसरशी काम होईल. कोणत्याही अडचणीच्या परिस्थितीत, Google Pay वरून ताबडतोब कर्ज घेतले जाऊ शकते. Google Pay ने DMI Finance Limited सह भागीदारी केली आहे. या भागीदारीत दोन्ही कंपन्या संयुक्तपणे डिजिटल पर्सनल लोन (Digital Personal Loan) ऑफर करत आहेत. Google Pay च्या ग्राहकांना DMI द्वारे दिलेली जास्तीत जास्त कर्जाची रक्कम 1 लाख रुपये असेल. तुम्ही ते जास्तीत जास्त 36 महिन्यांच्या हप्त्यांमध्ये परत करू शकता. ही भागीदारी देशभरात 15,000 पिन कोडवर सुरू करण्यात आली आहे. NSE च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या घरावर Income Tax ची छापेमारी कर्ज घेण्यासाठी ही अट आवश्यक या कर्ज सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही Google Pay कस्टमर असणे आवश्यक आहे. जर तुम्ही Google Pay चे युजर्स असाल आणि तुमचा क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल तर तुम्हाला लगेच कर्ज मिळेल. तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. Paytm कडून मिळतंय विना गॅरंटी 5 लाखांचं झटपट लोन, काय करावं लागले? हे इंस्टन्ट लोन Google Pay वापरणाऱ्या प्रत्येकासाठी उपलब्ध होणार नाही. तुम्हाला कर्ज मिळेल की नाही हे तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीवर अवलंबून असेल. या सुविधेअंतर्गत, प्री क्वॉलिफाईड एलिजिबल यूजर्स DMI फायनान्सने ठरवलेल्या निकषांनुसार कर्ज मिळवू शकतील. अशा ग्राहकांना Google Pay वरून कर्ज दिले जाईल. जर तुम्ही प्री क्वॉलिफाईड एलिजिबल यूजर्स असाल तर तुमच्या इनस्टंट अर्जावर रिअल टाइममध्ये प्रक्रिया केली जाईल. प्रक्रियेनंतर काही मिनिटांतच पैसे तुमच्या बँक खात्यात येतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या