JOIN US
मराठी बातम्या / मनी / भारतातल्या स्मार्टफोन शिपमेंटमध्ये घसरण; या ब्रँडला मोठा फटका; काय आहे कारण?

भारतातल्या स्मार्टफोन शिपमेंटमध्ये घसरण; या ब्रँडला मोठा फटका; काय आहे कारण?

भारतातल्या स्मार्टफोन मार्केटने पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वांत जास्त Q1 घसरण आहे.

जाहिरात

भारतातल्या स्मार्टफोन शिपमेंटमध्ये घसरण

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 एप्रिल : स्मार्टफोनचा वापर प्रचंड वाढला आहे. आजच्या घडीला जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे साधा मोबाइल फोन किंवा स्मार्टफोन आहे. ही स्थिती मोबाइल निर्मिती इंडस्ट्रीसाठी फायद्याची आहे, असं कोणीही म्हणेल; मात्र भारतातली प्रत्यक्ष परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे. भारतातल्या स्मार्टफोन शिपमेंटमध्ये 2023च्या पहिल्या तिमाहीत (Q1) 19 टक्के इयर-ऑन-इयर घट झाली आहे. ही घट होऊन भारतातली शिपमेंट 31 दशलक्ष युनिट्सवर पोहोचली आहे, असं काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. भारतातल्या स्मार्टफोन मार्केटने पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वांत जास्त Q1 घसरण आहे. ही घसरण कशामुळे झाली, स्मार्टफोनचा ट्रेंड आणि या तिमाहीत मोबाइल कंपन्यांनी देशात कशी कामगिरी केली हे लक्षात घेतलं पाहिजे. काउंटरपॉइंट या मार्केट रिसर्च फर्मने आपल्या अहवालात म्हटलं आहे, की भारतीय स्मार्टफोन शिपमेंटमध्ये ही सलग तिसरी तिमाही घट आहे. मागणीत घट, 2022पासून वाढलेली इनव्हेंटरी, नूतनीकरण केलेल्या फोनला ग्राहकांची वाढती पसंती आणि बाजारातल्या निराशावादी चॅनेल व्ह्यूमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. Realmeला सर्वांत जास्त फटका Realme ने Q1 2023मध्ये 52 टक्के इयर-ऑन-इयर घसरण पाहिली. या घसरणीमुळे ब्रँड 9 टक्के शेअरसह पाचव्या स्थानावर ढकलला गेला आहे. कंपनीने 10 हजार रुपयांच्या उप-सेगमेंटमध्ये इन्व्हेंटरी तयार करणं आणि बाजारातली प्रतिकूल परिस्थिती यांसारख्या आव्हानांना तोंड दिलं आहे. Realme C55 सीरिजने या तिमाहीत चांगली कामगिरी केली. याचा शिपमेंटमध्‍ये 11 टक्के वाटा होता. 5G फोनमध्ये सॅमसंग आघाडीवर सॅमसंगने सलग दुसऱ्या तिमाहीत भारतीय स्मार्टफोन बाजारात आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. Q1 2023मध्ये देखील कंपनीचा मार्केट शेअर 20 टक्के राहिला आहे. सॅमसंगने 5G स्मार्टफोन शिपमेंटचं नेतृत्व केलं. एकूण शिपमेंटमध्ये त्याचा वाटा 24 टक्के इतका आहे. कंपनीच्या 5G-कॅपेबल A सीरिजने ऑफलाइन बाजारपेठेत चांगली कामगिरी केली आणि कंपनीच्या शिपमेंटमध्ये 50 टक्के योगदान दिलं. कंपनीचा अल्ट्रा-प्रिमियम विभाग 247 टक्क्यांनी वाढला आहे. वाचा - iPhone खरेदी करायचायं? मग Flipkart ने तुमच्यासाठी आणलीये खास ऑफर Vivoने केलं स्वस्त प्रीमियम सेगमेंटचं नेतृत्व 2023 च्या Q1मध्ये 3 टक्के वार्षिक घसरण होऊनही 17 टक्के मार्केट शेअरसह Vivoने दुसरं स्थान कायम राखलं आहे. कंपनीची सर्व चॅनेलमध्ये असलेली उत्तम उपस्थिती आणि किफायतशीर किमतींमुळे कंपनीचं स्थान टिकवून ठेवण्यात मदत झाली आहे. 40 टक्के शेअरसह व्ही सीरिजद्वारे चालविलेल्या परवडणाऱ्या प्रीमियम सेगमेंटमध्ये Vivo हा आघाडीचा ब्रँड होता. भारतात Xiaomi वरचं संकट कायम Xiaomi ने Q1 2022पासून लक्षणीय घसरण अनुभवली आहे. या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत कंपनी तिसऱ्या स्थानावर आली आहे. या चिनी कंपनीला 16 टक्के शेअर मिळवण्यासाठी 44 टक्के इयर-ऑन-इयर घसरण बघावी लागली. ही ब्रँडने आतापर्यंत नोंदवलेली सर्वांत मोठी घसरण आहे. 10 हजारांच्या सब-सेगमेंटमधली कमी मागणी, ऑफलाइन चॅनेलमध्ये मागणी जास्त असतानाही ऑनलाइन चॅनेलवर अधिक अवलंबित्व आणि गोंधळात टाकणारा पोर्टफोलिओ यामुळे ही घट झाली. Redmi Note 12 सीरिजचं Xiaomiच्या एकूण शिपमेंटमध्ये 14 टक्क्यांपेक्षा जास्त योगदान आहे. Oppo शिपमेंटमध्ये वाढ Oppoने 12 टक्के शेअरसह 9 टक्के वार्षिक वाढ नोंदवल्याने एकूण शिपमेंटमध्ये चौथं स्थान मिळवलं आहे. ब्रँडने अप्पर मिड-टियर रेजवर (रु. 20,000-रु. 30,000) लक्ष केंद्रित केलं आहे. ब्रँडला तिथेच सर्वाधिक वाढ बघता आली. F सीरिजमुळे 144 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. OnePlus ठरला फास्टेस्ट ग्रोइंग ब्रँड OnePlus हा सर्वांत वेगानं वाढणारा ब्रँड ठरला आहे. कंपनीने Q1 2023मध्ये 72 टक्के इयर-ऑन-इयर वाढ नोंदवली आहे. ब्रँडने 30 टक्के शेअरसह प्रीमियम सेगमेंटमध्ये (रु. 30,000-रु. 45,000) दुसरं स्थान पटकावलं. OnePlus Nord CE 2 Lite आणि OnePlus 11 या सीरिजला मिळालेल्या जोरदार प्रतिसादामुळे कंपनीला फायदा झाला आहे. याव्यतिरिक्त, OnePlus Nord CE 2 Lite 5G ही Q1 2023मध्ये सर्वाधिक विकली गेलेली मॉडेल्स आहेत. अ‍ॅपलने केलं प्रीमियम सेगमेंटचं नेतृत्व अ‍ॅपलने 50 टक्के इयर-ऑन-इयर वाढ नोंदवली आहे. Q1 2023मधल्या एकूण स्मार्टफोन शिपमेंटमध्ये कंपनीचा 6 टक्के वाटा आहे. एकूण प्रीमियम विभागामध्ये, तसंच अल्ट्रा-प्रीमियम विभागात अनुक्रमे 36 टक्के आणि 62 टक्के शेअर्ससह कंपनीने आघाडीचं स्थान कायम ठेवलं आहे. नुकतंच कंपनीने भारतात स्वतःची रिटेल स्टोअर्स उघडल्याने अ‍ॅपलची ब्रँड प्रतिमा आणखी मजबूत होईल आणि संपूर्ण अ‍ॅपल इकोसिस्टीमला वाढीचे चांगले मार्ग मिळतील. ट्रान्स्शन ग्रुपने नोंदवली वाढ ट्रान्स्शन ग्रुपब्रँड्स Itel, Infinix आणि Tecno यांचा भारताच्या हँडसेट मार्केटमध्ये 16 टक्के वाटा आहे. स्थानिक ब्रँड्समध्ये, Lavaने सर्वांत स्वस्त 5G स्मार्टफोन (Blaze 5G) ऑफर केल्यामुळे, 10 हजार रुपयांच्या सब-सेगमेंटमध्ये रीफ्रेश केलेल्या पोर्टफोलिओसह चांगली कामगिरी केली. तसंच 29टक्के वार्षिक वाढीसह Q1 2023मध्ये सर्वांत वेगाने वाढणारा हा तिसरा ब्रँड ठरला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या