JOIN US
मराठी बातम्या / मनी / Share Market updates: रशिया-युक्रेन वादाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम; Sensex 1000 तर Nifty 290 पॉईट्सने खाली

Share Market updates: रशिया-युक्रेन वादाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम; Sensex 1000 तर Nifty 290 पॉईट्सने खाली

Share Market updates: भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण दिसून येत आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये मोठी घसरण झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 फेब्रुवारी : शेअर बाजारात (Share Market) अस्थितरता कायम असल्याचं दिसून येत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव (Russia Ukraine conflict) शिगेला पोहोचला असून त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Indian Share Market) सुद्धा पहायला मिळत आहे. आज (22 फेब्रुवारी 2022) भारतीय शेअर बाजार उघडताच मोठी घसरण पहायला मिळाली. भारतीय बाजार शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स (Sensex) 1000 पॉईंटसने तर निफ्टी (Nifty) 290 पॉईंट्सने घसरण झाल्याचं पहायला मिळालं. (Indian Share Market news live updates) रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव कायम आहे. त्यातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. त्यामुळे याचा परिणाम संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसून येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. रशिया-युक्रेन तणावादरम्यान निर्माण झालेल्या युद्धसदृश्य परिस्थितीमुळे मंगळवारी सलग पाचव्या दिवशी भारतीय शेअर बाजारावर त्याचा परिणाम दिसून आला. वाचा :  युक्रेनमधील डोनेत्सक आणि लुगंस्क यांना स्वतंत्र देशाची रशियाने दिली मान्यता, सैन्य पाठवण्याचे पुतिन यांचे आदेश बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टी (NSE Nifty) दोन्हीमध्ये प्री मार्केट ओपनिंगमध्येच मोठी घसरण होणार असल्याचे संकेत देत होतं. प्री मार्केट ओपनिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 1200 पॉईंट्सने खाली दाखवत होतं आणि जेव्हा मार्केट ओपन झालं तेव्हा सेन्सेक्सची सुरुवात 999 पॉईंट्सने घसरणीसह झाली. निफ्टी 17 हजारांच्या खाली  पुढील काही मिनिटांत शेअर बाजारात खूपच वोलॅटिलिटी दिसून आली. काही वेळातच सेन्सेक्सने 150 पॉईंटसने रिकवरी सुद्धा केली पण 9.20 वाजता पुन्हा सेन्सेक्स जवळपास 990 पॉईंट्सने सुरू झाला. त्यानंतर 56,700 पॉईंट्सवर सेन्सेक्स ट्रेंड करत आहे. याचप्रमाणे निफ्टीची सुरवातही 300 पॉईंट्सहून अधिक पॉईंट्सने घसरणीसह झाली. त्यामुळे निफ्टी 17 हजारांच्या खाली सध्या ट्रेंड करत आहे. यापूर्वी सोमवारी सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली होती. गेल्या आठवड्यात 5 पैकी 4 दिवस शेअर बाजारची सुरुवात रेड कॅन्डलने झाली होती. सोमवारी मार्केट बंद झालं तेव्हा सेन्सेक्स 149.38 (0.26 टक्के) पॉईंट्सने खाली येत 57,683.59 अंकांवर होता. तर निफ्टीत 69.65 (0.40 टक्के) अंकांनी खाली येत 17,206.65 अंकांवर बंद झाला. यापूर्वी शुक्रवारी सेन्सेक्स 59.04 पॉईंट्सने खाली येत 57,832.97 पॉईंट्सने तर एनएसई निफ्टी 28.30 पॉईंट्सने घसरणीसह 17,276.30 पॉईंट्सवर बंद झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या