JOIN US
मराठी बातम्या / मनी / एकाच बँक अकाउंटवरुन सर्व व्यवहार करता? मग ही माहिती तुम्हाला असायलाच हवी

एकाच बँक अकाउंटवरुन सर्व व्यवहार करता? मग ही माहिती तुम्हाला असायलाच हवी

ऑनलाईन फ्रॉडमध्ये बहुतांश लोकांना मोठ्या रकमेला मुकावं लागतं कारण ते सर्व आर्थिक व्यवहारांसाठी एकच बँक खातं वापरतात.

जाहिरात

ऑनलाइन बँकिंग

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

डिजिटायझेशनमुळे डिजिटल पेमेंट्सचा वापर वाढला आहे. पण त्यासोबतच फ्रॉडच्या घटनाही वाढत आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2022-23 मध्ये देशात UPI ट्रॅन्झॅक्शन्समुळे 95,000 हून अधिक फसवणुकीच्या घटनांची नोंद झाली आहे. फ्रॉड टाळण्यासाठीचे काही उपाय व पर्याय याबद्दल जाणून घेऊयात. ‘गॅजेट्स नाऊ’ने या संदर्भात वृत्त दिलंय. ऑनलाईन फ्रॉडमध्ये बहुतांश लोकांना मोठ्या रकमेला मुकावं लागतं कारण ते सर्व आर्थिक व्यवहारांसाठी एकच बँक खातं वापरतात. त्याऐवजी मोठी रक्कम ठेवलेल्या बँक खात्याचा वापर ऑनलाईन व्यवहारांसाठी करू नये. व्यवहारांसाठी वेगळं खातं वापरावं. तुमच्या दैनंदिन व्यवहारांसाठी एअरटेल पेमेंट बँकेची निवड करू शकता कारण बँक डिजिटल व्यवहारांत तुम्हाला खूप उच्च दर्जाची सुरक्षितता पुरवते.

एअरटेल पेमेंट्स बँकच का?

दैनंदिन आर्थिक व्यवहारांचं वेगळं खातं आणि मुख्य खातं वेगळं केलत की तुम्ही अर्धी लढाई जिंकलात. तुमचे दैनंदिन आर्थिक व्यवहार करण्यासाठी डिजिटल सेवा निवडताना तिची सुरक्षितता सोय हे पाहणं महत्त्त्वाचं असतं. एअरटेल पेमेंट्स बँकेची सुविधा या दोन्ही कसोट्यांवर उत्तीर्ण होते त्यामुळे तुम्ही एअरटेल पेमेंट्स बँकेत तुमचं खातं काढू शकता. दोन खाती करण्याचा फायदा असा की रोज अनेक ट्रॅन्झॅक्शन्स झाली तर त्यांचा हिशेब मांडणं अवघड होऊन बसतं आणि ते काम किचकट होतं. त्याऐवजी सेव्हिंगचं खातं वेगळं आणि व्यवहारांचं खातं वेगळं केलं की हे किचकट काम वाचतं तसंच सेव्हिंगमधली मोठी रक्कमही सुरक्षित राहते.

Coin Deposit Rule: बँकेत एकाच वेळी किती नाणी जमा करता येतात? RBI चा नियम काय?

संबंधित बातम्या

एअरटेल पे सेफ

एअरटेल पे सेफ या फीचरमुळे तुमचे आर्थिक व्यवहार अत्यंत सुरक्षित होतात आणि अतिरिक्त सुरक्षिततेमुळे कुठल्याही व्यवहारात तुमच्या बँक खात्यातून तुमच्या परवानगीशिवाय पैसे पाठवले जात नाहीत. या सेवेत तुमच्या खात्यातील अवैध व्यवहार आणि घोटाळ्यांना पायबंद बसतो. या Rewards123 सेवेमुळे तुम्हाला विविध ऑफर्स उपलब्ध होतात. तुम्ही Digi Gold सेवेअंतर्गत 24 तास सोनं खरेदी-विक्री करू शकता. बँकेत तुम्ही कमीतकमी पाचशे रुपयांपासून 7.75 टक्के वार्षिक व्याज दराने एफडी करू शकता त्याला आयकर माफी मिळते. खातं बंद केलंत तर त्या क्षणी पैसे बँकेत जमा होतात. त्यामुळे सुरक्षित आर्थिक व्यवहार, सहज व्यवहार, गुंतवणूक, सोनं खरेदी-विक्री यासाठी तुम्ही Airtel Payments Bank मध्ये खातं उघडू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या