JOIN US
मराठी बातम्या / मनी / करदात्यांनो चुकूनही विसरु नका मे महिन्यातील 'या' चार तारखा, अन्यथा...

करदात्यांनो चुकूनही विसरु नका मे महिन्यातील 'या' चार तारखा, अन्यथा...

या कामांची अंतिम मुदत संपली तर तुम्हाला पूर्ण कर भरावा लागेल शिवाय दंड आणि विलंब शुल्कदेखील भरावं लागेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 मे: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून आयकराशी संबंधित सर्व बदल लागू झाले आहेत. करदात्यांना त्यांचा आयटीआर भरण्याची सर्वांत जास्त काळजी असते. पण, त्याआधी इतर अनेक कर-संबंधित डेडलाईन पूर्ण करणं आवश्यक असतं. इन्कम टॅक्सशी संबंधित चार कामांची अंतिम मुदत मे महिन्यात आहे. करदात्यांना ही सर्व कामं निर्धारित वेळेत निकाली काढावी लागणार आहेत. जर या कामांची अंतिम मुदत संपली तर तुम्हाला पूर्ण कर भरावा लागेल शिवाय दंड आणि विलंब शुल्कदेखील भरावं लागेल. करदात्यांच्या सोयीसाठी, इन्कम टॅक्स विभागानं करसंबंधित कामं आणि त्यांची अंतिम मुदत या संबंधी एक कॅलेंडर जारी केलं आहे. यामध्ये सर्व आवश्यक तारखा नमूद केल्या आहेत. त्यानुसार करदाते त्यांची कर भरण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. कंपन्यांसाठी 7 मे ही अंतिम मुदत कंपन्या आणि फर्म्ससाठी पहिली अंतिम मुदत 7 मे रोजी येत आहे. एप्रिलमध्ये गोळा केलेले टीसीएस आणि टीडीएस जमा करण्याची शेवटची तारीख 7 मे 2023 आहे. हा टीडीएस कर्मचाऱ्यांच्या कमाईतून कापला जातो. प्रत्येक नियोक्ता प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपर्यंत आयकर विभागाकडे हा टीडीएस जमा करतो. टीडीएस भरण्याची शेवटची मुदत चुकवल्याबद्दल विलंब शुल्क आणि दंडदेखील लागू केला जाऊ शकतो. 15 मे हा दिवसदेखील आहे महत्त्वाचा मार्च 2023 मध्ये, कलम 194-IA, 194-IB, 194M आणि 194S अंतर्गत कर कपात केलेलं टीडीएस प्रमाणपत्र 15 मेपर्यंत जारी करणं बंधनकारक आहे. आयकर विभागानं ही मुदत निश्चित केली आहे. या शिवाय, फॉर्म 24G सबमिट करण्याची शेवटची तारीखदेखील 15 मे आहे. एप्रिल महिन्यासाठी चलनाशिवाय टीडीएस-टीसीएस जमा करण्याची अंतिम मुदतही 15 मे ठेवण्यात आली आहे. एवढंच नाही तर मार्च तिमाहीचं टीसीएस स्टेटमेंट सादर करण्याची अंतिम मुदत देखील 15 मे आहे. 30 मेपर्यंत आवरा ही कामं असे अनिवासी भारतीय जे भारतात त्यांची कंपनी चालवतात, त्यांना फॉर्म 49C चे स्टेटमेंट 30 मे पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. हा फॉर्म आर्थिक वर्ष 2022-23 साठी असेल. याशिवाय, एप्रिल महिन्यात कलम 194-IA, 194M, 194-IB आणि 194S अंतर्गत कपात केलेल्या टीडीएसचं चलान स्टेटमेंट सादर करण्याची अंतिम मुदत देखील 30 मे आहे. याशिवाय चौथ्या तिमाहीचं टीसीएस प्रमाणपत्रही त्याच तारखेला सादर करावं लागणार आहे. 31 मे अखेर पूर्ण करावी लागणार ‘ही’ कामं फॉर्म 61A चे फायनान्शिअल ट्रान्झॅक्शन स्टेटमेंट जारी करण्याची 31 मे ही शेवटची तारीख आहे. कलम 285BA अंतर्गत रिपोर्ट करण्यायोग्य बाबींचे वार्षिक स्टेटमेंट दाखल करण्याची अंतिम मुदत देखील 31 मे आहे. अनिवासी भारतीय जे भारतातील कोणत्याही कंपनीचे एमडी, संचालक, भागीदार, विश्वस्त, लेखक, संस्थापक किंवा सीईओ आहेत त्यांना PAN अर्ज करण्यासाठी 31 मे ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या