JOIN US
मराठी बातम्या / मनी / FD करणाऱ्यांसाठी खुशखबर! या 2 बँकांनी वाढवले व्याजदर, चेक करा रेट्स

FD करणाऱ्यांसाठी खुशखबर! या 2 बँकांनी वाढवले व्याजदर, चेक करा रेट्स

ज्यांनी आपल्या कष्टाचे पैसे FD मध्ये गुंतवले आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक आणि इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.

जाहिरात

फिक्स्ड डिपॉझिट रेट्स

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केली. यानंतरपासून कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यात आली. यासोबतच आता बँक ठेवींवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. दरम्यान, खाजगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँक आणि इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. IDFC फर्स्ट बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींसाठी, बँक 3.5 टक्के ते 7.00 टक्के व्याज दर देतेय. IDFC फर्स्ट बँक सध्या 18 महिने 1 दिवस ते 3 वर्षे (549 दिवस ते 3 वर्षे) मुदतीच्या ठेवींवर जास्तीत जास्त 7.75 टक्के व्याजदर देतेय. बँकेचे नवीन दर 1 मार्च 2023 पासून लागू झाले आहेत.

IDFC फर्स्ट बँक एफडी रेट्स

-7 ते 29 दिवसांच्या FD वर 3.50 टक्के व्याजदर -30 ते 45 दिवसांच्या FD वर 4.00 टक्के व्याजदर -46-90 दिवसांच्या FD वर 4.50 टक्के -91-180 दिवसांच्या FD वर 5.00 टक्के व्याजदर -181 दिवस ते 366 दिवसांच्या FD वर आता 6.75 टक्के व्याज दर -367 दिवस ते 18 महिन्यां (367 दिवस ते 548 दिवस) च्या FD वर आता 7.25 टक्के व्याजदर मिळेल.

WhatsApp ने जानेवारीत अचानक बंद केले 29 लाख अकाउंट, तुम्हीही करताय का ही चूक?

स्मॉल फायनान्स बँकेचे रेट्स

Equitas Small Finance Bank चे नवीन FD दर 1 मार्च 2023 पासून लागू झाले आहेत. बँकेने सांगितले की त्यांचे ग्राहक 888 दिवसांच्या कालावधीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर 8.20 टक्के व्याज मिळवू शकतील. 12 महिने ते 24 महिन्यांच्या कालावधीसाठीच्या गुंतवणुकीवरील व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, सर्व प्रकारच्या खात्यांमध्ये व्याज भरणे तिमाही चालू राहील. घरगुती ज्येष्ठ नागरिकांना FD आणि RD दरांवर 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल.

अनेक बँकांनी एफडी रेट्स वाढवले ​​आहेत

विशेष म्हणजे 8 फेब्रुवारी रोजी आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ केली होती. रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानंतर देशातील अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी त्यांच्या एफडी दरात वाढ केली आहे. SBI, ICICI बँक, HDFC बँक, येस बँक यासारख्या अनेक बँकांनी अलीकडच्या काळात एफडीवर व्याज वाढवले ​​आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या