मुंबई, 9 जून : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) कालच रेपो रेटमध्ये (Repo Rate) वाढ केली. त्यानंतर हळूहळू बँका आपले व्याजदर वाढवणार हे निश्चित होतं. आता देशातील दुसरी सर्वात मोठी खाजगी बँक ICICI बँकेने कर्जदरात म्हणजेच कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने त्यात 50 बेसिस पॉइंट्सची वाढ करून 8.60 टक्के केली आहे. पूर्वी तो दर 8.10 टक्के होता. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) हा निर्णय घेतला आहे. काल, बुधवारी, आरबीआयने रेपोमध्ये 50 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.50 टक्के वाढ करून 4.90 टक्के केली. मध्यवर्ती बँकेने या दोन महिन्यांत म्हणजेच मे आणि जूनमध्ये रेपो दरात 0.90 टक्के वाढ केली आहे. Bank Strike: बँकेची कामं आधीच करुन घ्या; कर्माचारी ‘या’ दिवशी जाणार संपावर बँकेने कर्जदरात वाढ केल्यानंतर आजपासूनच गृहकर्ज, वाहन कर्ज आणि त्यांच्याशी संबंधित मासिक हप्त्यात (EMI) वाढ होणार आहे. आता उर्वरित बँकाही लवकरच कर्जदरात वाढ करतील, अशी शक्यता आहे. आरबीआयचा निर्णय 8 जून रोजी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील 6 सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने एकमताने रेपो दरात 50 आधार अंकांनी वाढ केली. हा एक प्रमुख धोरण दर आहे ज्यावर मध्यवर्ती बँक इतर बँकांना अल्प कालावधीसाठी कर्ज देते. आता हा दर 4.90 टक्के झाला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वाढत्या महागाईवर चिंता व्यक्त केली आहे. RBI गव्हर्नर म्हणाले की, महागाई सातत्याने वाढत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) पुरवठा समस्यांमुळे महागाई वाढली आहे. कोविड महामारीनंतर आरबीआय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पावले उचलत राहील. Post Office Schemes: पैसे बुडण्याची भीती नाही आणि बँकेपेक्षा जास्त व्याज; गुंतवणूकदारांना फायदा या कालावधीत, मुदत ठेव सुविधा (SDF) आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) दरांमध्ये 50 बेसिस पॉईंट्सनी (0.50 टक्के) वाढ करण्यात आली आहे. परमनंट डिपॉझिट फॅसिलिटी (SDF) दर जो पूर्वी 4.15% होता तो आता 4.65% पर्यंत वाढला आहे आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) दर आता 5.15% झाला आहे.