Mukesh Ambani
नवी दिल्ली, 17 मार्च : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Reliance Industries Ltd) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (CMD Mukesh Ambani) यांनी आणखी एक यश संपादन केले आहे. त्यांचा जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या (World Top-10 Billionaires) यादीत सामील झाला आहे. विशेष म्हणजे या यादीत स्थान मिळवणारे ते एकमेव भारतीय अब्जाधीश आहेत. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट-2022 (Hurun Global Rich List 2022) नुसार, अंबानी जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत 9व्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 103 अब्ज डॉलर आहे. त्यांनी केवळ सर्वात श्रीमंत भारतीय होण्याचा मान मिळवला आहे असे नाही तर आशिया खंडात त्यांची संपत्ती 24 टक्क्यांनी वाढली आहे. आरआयएल (RIL) चे CMD मुकेश अंबांनी यांनी सर्वात श्रीमंत दूरसंचार उद्योगपतीचा (Telecom Industrialist) किताबही पटकावला आहे. 50 व्या वर्षी सुरू केला Startup; Nykaaच्या Falguni Nayar अब्जाधीशांच्या यादीत 20 वर्षात 10 पटीने वाढली संपत्ती हुरुन ग्लोबल रिच लिस्ट-2022 मध्ये असे म्हटले आहे की आरआयएलचे सीएमडी मुकेश अंबानी यांनी त्यांचा वारसा अतिशय चांगल्या प्रकारे पुढे नेला आहे. याच आधारावर त्यांनी 20 वर्षात आपली संपत्ती 10 पटीने वाढवली आहे. त्यांची एकूण संपत्ती आता 103 अब्ज डॉलर आहे, जी 2002 मध्ये 10 अब्ज डॉलर होती. हे आहे जगातील टॉप-10 अब्जाधीश नाव कंपनी एकूण मालमत्ता एलोन मस्क टेस्ला 205 अब्ज डॉलर जेफ बेझोस अॅमेझॉन 188 अब्ज डॉलर बर्नार्ड अर्नॉल्ट एलवीएमएच 153 अब्ज डॉलर बिल गेट्स माइक्रोसॉफ्ट 124 अब्ज डॉलर वॉरेन बफे बर्कशायर हॅथवे 119 अब्ज डॉलर सर्गी ब्रिन अल्फाबेट 116 अब्ज डॉलर लॅरी पेज अल्फाबेट 116 अब्ज डॉलर स्टीव्ह बाल्मर माइक्रोसॉफ्ट 107 अब्ज डॉलर मुकेश अंबानी रिलायन्स 103 अब्ज डॉलर बर्ट्रांड पोच आणि कुटुंब हरमेस 102 अब्ज डॉलर (डिस्क्लेमर : नेटवर्क18 आणि TV18 कंपन्या स्वतंत्र मीडिया ट्रस्टद्वारे नियंत्रित चॅनल/वेबसाइट चालवतात, ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.)