JOIN US
मराठी बातम्या / मनी / घरबसल्या रिसेट करता येईल SBI चा ATM पिन, ही आहे सिंपल ट्रिक

घरबसल्या रिसेट करता येईल SBI चा ATM पिन, ही आहे सिंपल ट्रिक

एसबीआय एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डसाठी पिन रीसेट करणं किंवा जनरेट करणं खूप सोपं आहे.

जाहिरात

एसबीआय एटीएम पिन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जानेवारी: स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. या बँकेच्या ऑनलाइन सर्व्हिसेसमध्ये आपल्याला खूप सुविधा मिळतात. स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ऑनलाइन पोर्टलला अ‍ॅक्सेसही सोपा ठेवला आहे. त्यामुळे एसबीआय खातेधारकांना घरी बसून अनेक सुविधांचा लाभ घेता येतो. अशीच एक सुविधा आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचा एसबीआय एटीएम किंवा डेबिट कार्ड पिन घरी बसून जनरेट करू शकता. यासाठी तुम्हाला एटीएममध्ये जाण्याची गरज नाही. एसबीआय एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डसाठी पिन रीसेट करणं किंवा जनरेट करणं खूप सोपं आहे. चला जाणून घेऊया एटीएममध्ये न जाता हे कसं करता येईल? या संदर्भात ‘नवभारत टाइम्स’ने वृत्त दिलंय.

कमीत कमी किती दिवसांसाठी करता येते FD? काय आहेत नियम? घ्या जाणून

संबंधित बातम्या

SBI ATM पिन असा करा रिसेट

- सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पोर्टलवर जा. - पर्सनल बँकिंग डिटेल्स टाकून लॉगिन करा. - ई-सर्व्हिसेजवर जा आणि खाली ATM कार्ड सर्व्हिसेसपर्यंत स्क्रोलडाउन करा. - जनरेट न्यू एटीएम पिन या मेन्यूची ड्रॉप डाउन लिस्टमधून निवड करा. -प्रक्रिया पुढे नेण्यासाठी ‘Get Authorisation PIN’ वर टॅप करा. -यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल हा ओटीपी टाका आणि नंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करा. - आता ज्या अकाउंटचा एटीएम पिन तुम्हाला रिसेट करायचा आहे, ते अकाउंट निवडा. -यानंतर पिन रिसेट करण्यासाठी कार्ड डिटेल्स सिलेक्ट करा. - त्यानंतर तुमच्या आवडीची दोन डिजिट्स एंटर करा आणि बाकीची दोन डिजिट्स तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर SBI कडून पाठवली जातील. -तुमच्याजवळ ATM PIN चे ते चार डिजिट्स झाल्यानंतर ते एंटर करा आणि मग सबमिट ऑप्शनवर क्लिक करा. -या प्रक्रियेच्या शेवटी SBI तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज पाठवेल.

अशा रितीने तुम्ही घरबसल्या तुमच्या एटीएमचा पिन जनरेट करू शकता. त्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. या शिवाय पासबूक ऑनलाइन प्रिंट करून घेण्यापासून ते नवीन एटीएमसाठी अर्ज करणं, यासारख्या अनेक सुविधांचा लाभ तुम्ही एसबीआयच्या ऑनलाइन अ‍ॅप व पोर्टलच्या मदतीने घेऊ शकता. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे नेट बँकिंग असणं आवश्यक आहे. नेट बँकिग असल्यास या सुविधांचा लाभ घेता येईल, नाहीतर तुम्हाला त्यासाठी बँकेत जावं लागू शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या