JOIN US
मराठी बातम्या / मनी / Post Office मध्ये रोखीने व्याज देण्याची सुविधा बंद, व्याजाचे पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागेल?

Post Office मध्ये रोखीने व्याज देण्याची सुविधा बंद, व्याजाचे पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागेल?

बँक बचत खाते पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिटशी लिंक करण्यासाठी, ठेवीदाराला ईसीएस फॉर्म सोबत रद्द केलेला चेक किंवा बँक खाते पासबुक आणि MIS/SCSS/TD खाते पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत पडताळणीसाठी सबमिट करावी लागेल.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 एप्रिल : पोस्ट ऑफिस मंथला इन्कम स्कीम (MIS), सीनियर सिटीजन सेविंग्स स्कीम (SCSC) आणि मुदत ठेवींवर (Term Deposit) यापुढे रोख व्याज दिले जाणार नाही. आता व्याजाचे पैसे खात्यातच येतील. पोस्ट ऑफिस विभागाचे (Post Office Schemes) म्हणणे आहे की अशा खातेदारांनी त्यांचे पोस्ट ऑफिस बचत किंवा बँक खाते या खात्यांशी जोडले पाहिजे. नवीन नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू झाला आहे. एका अधिसूचनेत, पोस्ट विभागाने म्हटले आहे की व्याजाचे पैसे फक्त पोस्ट ऑफिस बचत योजना किंवा खातेदाराच्या बँक खात्यात जमा केले जातील. आता रोखीने व्याज मिळण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. जर खातेदाराने त्याचे बचत खाते सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, मासिक उत्पन्न योजना आणि मुदत ठेव खात्याशी जोडले नाही, तर थकबाकीचे व्याज पोस्ट ऑफिस बचत खात्यात जमा केल्यावरच दिले जाईल किंवा चेकद्वारे दिले जाईल.

Share Market: वर्षभरात पैसे दुप्पट, सरकारी मालकीच्या ‘या’ कंपनीमुळे गुंतवणूकदारांना लॉटरी

बँक खाते अशा प्रकारे लिंक केले जाऊ शकते बँक बचत खाते पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिटशी लिंक करण्यासाठी, ठेवीदाराला ईसीएस फॉर्म सोबत रद्द केलेला चेक किंवा बँक खाते पासबुक आणि MIS/SCSS/TD खाते पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत पडताळणीसाठी सबमिट करावी लागेल. बँक अकाऊंटमध्ये पैसे नसतील तरी वेळप्रसंगी काढता येतील 10,000 रुपये; काय आहे सरकारची सुविधा?   पोस्ट ऑफिस बचत खाते कसे लिंक करावे? पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या (Post Office Saving Account) बाबतीत, खातेधारकाने MIS/SCSS/TD खाते त्याच्या पोस्ट ऑफिस बचत खात्याशी त्याच्या एमआयएसशी जोडण्यासाठी फॉर्म एसबी-83 सबमिट करणे आवश्यक आहे. याशिवाय पोस्ट ऑफिस बचत खाते पासबुक देखील पडताळणीसाठी आवश्यक आहे. व्याजदरात बदल नाही सरकारने विविध लहान बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. याअंतर्गत सध्या सुकन्या समृद्धी योजनेत 7.6 टक्के, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत 7.4 टक्के, पीपीएफमध्ये 7.1 टक्के व्याज मिळत आहे. दुसरीकडे, SBI च्या 5-10 वर्षांच्या मुदत ठेवीवर 5.50 टक्के व्याज मिळत आहे. छोट्या बचत योजनांच्या व्याजदरांचे तिमाही आधारावर पुनरावलोकन केले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या