Bank Rules: लंच ब्रेक सांगत बँक काउंटर वेळेआधीच बंद केलं तर काय करायचं? इथे करा तक्रार लगेच होईल कारवाई
मुंबई,21 जुलै: बँक कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईचे किस्से रोज ऐकायला मिळतात. तुमच्यासोबत असं झालं असेल की तुम्ही महत्त्वाच्या कामामुळे बँकेत पोहोचलात आणि बँक कर्मचारी तुम्हाला दुपारच्या जेवणानंतर यायला सांगतो किंवा मग तुम्ही वेळेवर पोहोचल्यावर कर्मचारी सीटवर भेटले नाहीत. सोप्या भाषेत सांगायचं तर, बँक कर्मचारी (Bank Employee) तुम्हाला तुमच्या कामासाठी इकडून तिकडे घेऊन जात असेल, तर नाराज होऊ नका. तुम्ही त्याबद्दल तक्रार (complaint against bank employee) करू शकता आणि जबाबदारांवर कारवाई होऊ शकते. माहितीची कमतरतेमुळं होतो त्रास- ग्राहकांना बँकिंग सेवांशी संबंधित काही अधिकार मिळाले आहेत. जर त्यांना बँकेनं नियमाप्रमाणे सेवा दिली नाही, तर ते त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. बँकेत ग्राहकांना असे अनेक अधिकार मिळतात, जे सहसा ग्राहकांना माहीत नसतात. बँकेने ग्राहकांना नियमानुसार सेवा देणं महत्त्वाचं आहे. बँकेनं योग्य वागणूक न दिल्यास ग्राहकांना थेट रिझर्व्ह बँकेकडे (RBI) संपर्क साधण्याचा अधिकार आहे. असं कोणतेही प्रकरण तुमच्या निदर्शनास आल्यास, तुम्ही बँकिंग लोकपालकडे तक्रार करून तुमच्या समस्येचं निराकरण करू शकता. बँक ग्राहकांना अनेक अधिकार आहेत (Bank Customer Rights)- बँकेच्या ग्राहकांना अनेक अधिकार देण्यात आले आहेत, मात्र त्याबाबत माहिती नसल्याने कर्मचाऱ्यांच्या बेपर्वाईला तोंड देत ते शांत बसतात. कोणत्याही बँकेच्या कर्मचाऱ्याला तुमचं काम करण्यास उशीर झाला तर तुम्ही त्या बँकेच्या व्यवस्थापक किंवा नोडल ऑफिसरकडे तक्रार करू शकता. याशिवाय जवळपास प्रत्येक बँकेत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण मंच असतो. ज्याद्वारे तुम्ही तुमची तक्रार सोडवू शकता. हेही वाचा: Job Opportunity : काम अत्यंत साधं, कोट्यवधींचा वार्षिक पगार तरीही मिळत नाहीत कामगार तक्रार निवारण क्रमांकावर तक्रार करा (Customer Care Services)- तुम्ही ज्या बँकेत असाल त्या बँकेच्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीसाठी तुम्ही बँकेचा तक्रार निवारण क्रमांक घेऊन तक्रार करू शकता. याशिवाय बँकेचा टोल फ्री क्रमांकही समस्या सांगू शकतो. काही बँका ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सुविधाही देतात. देशातील आघाडीच्या बँकेबद्दल सांगायचे तर, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक कोणत्याही शाखेतील कर्मचाऱ्याबद्दल टोल फ्री क्रमांक 1800-425-3800 /1-800-11-22-11 वर तक्रार करू शकतात. पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) ग्राहक बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांकावर किंवा अपील प्राधिकरणाशी संपर्क साधू शकतात. पीएनबीच्या वेबसाइटवर माहिती सहज मिळू शकते. बँकिंग लोकपालला कळवा समस्या - बँक कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणाबद्दल तुम्हाला बँकिंग लोकपालकडे तक्रार करायची असल्यास, तुम्ही तुमची तक्रार कॉल करून किंवा ऑनलाइन मोडद्वारे पाठवू शकता. तुमची तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही https://cms.rbi.org.in या वेबसाइटवर लॉग इन करू शकता आणि तक्रार दाखल करू शकता. किंवा तुम्ही crpc@rbi.org.in वर मेल पाठवून तुमची समस्या नोंदवू शकता. बँकेच्या ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 14448 असून, त्यावर कॉल करूनही ग्राहक तक्रारी करू शकतात.