Online Tax Filing: ऑनलाइन रिटर्न भरताना होणारा त्रास संपणार, टाटाच्या ‘या’ अॅपमध्ये आहेत उत्तम सुविधा
मुंबई, 20 जुलै: आता तुम्ही तुमचा आयटीआर ऑनलाइन सहजपणे दाखल करू शकता. टाटा कॅपिटलच्या (Tata Capital) डिजिटल वेल्थ मॅनेजमेंट अॅप मनीफाय (Moneyfy App) या अॅपने TaxBlock India Pvt Ltd आणि Span Exos IT Solutions Pvt Ltd (taxspanner.com) या ई-रिटर्न मध्यस्थांच्या सहकार्याने ऑनलाइन कर भरण्याची वैशिष्ट्ये सुरू केली आहेत. या नवीन वैशिष्ट्यांच्या मदतीने, मनीफायचे वापरकर्ते सहजपणे रिटर्न भरण्यास सक्षम असतील. मॅनिफाई हे टाटा कॅपिटलचे डिजिटल वेल्थ मॅनेजमेंट अॅप आहे. याद्वारे वापरकर्त्यांना गुंतवणूक, विमा आणि कर्ज सेवा सहज मिळतात. याशिवाय, त्यावर GST, US कर, TDS/TCS जलद आणि सुरक्षित पद्धतीने दाखल करण्याची सुविधा आहे. या अॅपमध्ये अकाउंटिंग, टॅक्सेशन आणि बिझनेस कंप्लायन्स सारखी वैशिष्ट्ये देखील आहेत. ज्यांना यंदा आयटीआर भरायचा आहे, अशा लोकांना टाटाच्या या मनीफाय अॅपचा खूपच फायदा होणार आहे. या अॅपबद्दल फायद्यांबद्दल आपण जाणून घेऊया. Moneyfy App सह ई-कर फाइलिंगचे हे आहेत फायदे-
हेही वाचा: PM Kisan योजनेचा लाभ घेताना चुकीची माहिती देऊ नका, शिक्षेसह आर्थिक फटका बसू शकतो ITR दाखल करण्याची अंतिम मुदत आली जवळ - आयटीआर (Income Tax Return) भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. अशा परिस्थितीत, हे शक्य तितक्या लवकर हाताळलं पाहिजे जेणेकरुन अंतिम मुदत जवळ आल्यावर कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक समस्या टाळता येतील. याशिवाय, कोणत्याही प्रकारची कायदेशीर अडचण टाळण्यासाठी, वेळेपूर्वी आयटीआर फाइल करा. वैयक्तिक आणि HUF करदात्यांसाठी ज्यांच्या खात्यांचं ऑडिट केलेलं नाही, रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 आहे. दुसरीकडे, कंपन्या, फर्म, प्रोप्रॉयटरशिप इत्यादी करदात्यांच्या खात्यांचे ऑडिट केलं जाणार आहे, त्यांना अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2022 आहे. याशिवाय, जर आर्थिक वर्षात आंतरराष्ट्रीय व्यवहार झाले असतील तर त्यासाठी कलम 92E अंतर्गत अहवाल द्यावा लागेल. अशा करदात्यांना रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2022 आहे.