कार लोनसाठी ताजे व्याजदर
मुंबई, 20 ऑगस्ट : आपली स्वत:ची कार खरेदी करणे मोठा आनंदाचा क्षण असतो. अशा वेळी आनंदात असताना देखील आपण पैशाबाबत योग्य निर्णय घेतले पाहिजेत. घर किंवा कार लोन करतेवेळी डाऊन पेमेंट, कालावधी याबाबत निवड करताना याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. अनेक बँका कमाल 7 ते 8 वर्षांच्या कालावधीसाठी कार लोन देतात. व्याज दर तसेच प्रोसेसिंग फी, प्रीपेमेंट फी आणि कार कर्जांसंबंधी इतर शुल्क तपासून घ्या. कार खरेदी करताना ही योग्य वेळ आहे का हे तुम्ही 20:4:10 या नियमाद्वारे तपासू शकता. डाऊन पेमेंट किमान 20 टक्के कार खरेदी करताना सर्वात आधी तुमच्याकडे किती डाऊन पेमेंट आहे याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार जास्तीत जास्त डाऊनपेमेंट केले तर तुमचे व्याजात जाणाऱ्या पैशांची बचत होईल. म्हणजेच तुम्ही तुमची पहिली कार खरेदी करताना ऑन रोड प्राईजच्या किमान 20 टक्के डाऊन पेमेंट तुमच्याकडे असायला हवं.
कर्जाचा कालावधी 4 वर्षापेक्षा अधिक नको दुसरी गोष्ट म्हणजे कर्जाचा कालावधी चार वर्षापेक्षा जास्त ठेवू नये. कारण बँका जरी दीर्घ कालावधीची ऑफर देत असतील तरी, कर्जदारांनी EMI लक्षात ठेवून कमी मुदतीची निवड करावी. कार्यकाळ जितका लहान असेल तितका EMI जास्त असतो. मात्र कमी कार्यकाळ म्हणजे जास्त EMI भरणे, याचा अर्थ व्याजही कमी जाते. अनेकदा लोक कर्ज दीर्घ कालावधीसाठी निवड करतात जेणेकरून त्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल. मात्र यात जास्त व्याज खर्च आणि अतिरिक्त आर्थिक भार देखील असतो. त्यामुळे जर कार लोनचा कालावधी जितका जास्त तुम्ही निवडता तितका जास्त व्याज खर्च तुम्हाला करावा लागेल. UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करणं होणार महाग; डेबिट कार्ड ट्रान्झॅक्शनसाठीही लागणार शुल्क EMI उत्पन्नाच्या कमाल 10 टक्के असावा त्यानंतर कर्जाचा EMI हा तुमच्या महिन्याच्या इनकमपेक्षा कमाल 10 टक्के असाला. कारण कार खरेदी केल्यानंतर कारचा मेंटेनन्स आणि इंधनाचा खर्च यात वाढ होते. त्यामुळे तो खर्च देखील वाढतो. म्हणून तुमच्या इनकमचा मोठा भाग जर तुमच्या कारवर खर्च होत असेल तर तुमचं भविष्यातील आर्थिक नियोजन बिघडू शकतं.