JOIN US
मराठी बातम्या / मनी / तुमचे इनकम टॅक्स रिफंडचे पैसे अजून आले नाही? ऑनलाईन कसं तपासाल स्टेटस?

तुमचे इनकम टॅक्स रिफंडचे पैसे अजून आले नाही? ऑनलाईन कसं तपासाल स्टेटस?

तुमचा आयकर परतावा येणार असेल तर तुम्ही त्याची स्थिती ऑनलाइन तपासू शकता. आयकर ई-फायलिंग पोर्टलद्वारे किंवा NSDL च्या वेबसाइटद्वारे स्थिती तपासली जाऊ शकते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 मार्च : जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला असेल, तर तुमच्या खात्यात रिफंडचे पैसे आले आहेत की नाही ते त्वरीत तपासा. खरंतर, अलीकडेच प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) म्हटले आहे की 1 एप्रिल 2021 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत आतापर्यंत 2.09 कोटी करदात्यांना 1.83 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर परतावा जारी केला आहे. यामध्ये 2.07 कोटी वैयक्तिक करदात्यांना 65,938 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परतावा आणि 2.30 लाख युनिट्ससाठी 1.17 लाख कोटी रुपयांचा परतावा समाविष्ट आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नातून विहित मर्यादेपेक्षा जास्त कर कापला जातो, तेव्हा तो परतावा मिळण्यास पात्र होतो. यासाठी आयकर विभागाकडे आयटीआर दाखल करावा लागतो. मार्च महिना अखेरपर्यंत ‘ही’ कामे करुन घ्या; अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं तुमचा आयकर परतावा येणार असेल तर तुम्ही त्याची स्थिती ऑनलाइन तपासू शकता. आयकर ई-फायलिंग पोर्टलद्वारे किंवा NSDL च्या वेबसाइटद्वारे स्थिती तपासली जाऊ शकते. Share Market: शेअर बाजारातील अस्थिरतेदरम्यान कोणते फॅक्टर्स ठरतील महत्त्वाचे? तज्ज्ञांचं म्हणणं काय? आयकर रिफंड आला की नाही कसं तपासाल? सर्वप्रथम आयकर विभागाच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलवर जा. येथे लॉगिन करा. त्यानंतर View Return/Forms वर क्लिक करा. आता आयकर रिटर्न निवडा आणि मूल्यांकन वर्ष भरा. परताव्याची स्थिती कळेल. रिफंड स्टेटसची माहिती NSDL च्या वेबसाईटवरून देखील मिळू शकते. आयकर परतावा अडकण्याच्या प्रकरणांमध्ये एक प्रमुख कारण म्हणजे बँक खात्याच्या तपशीलातील चूक असते. फॉर्म भरताना तुम्ही तुमच्या खात्याचा तपशील चुकीचा टाकला असेल, तर त्यामुळे तुमचा आयकर परतावा अडकू शकतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाइटवर खात्याचे तपशील दुरुस्त करावे लागतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या