JOIN US
मराठी बातम्या / मनी / तुमच्या PF अकाउंटमध्ये लवकरच येणार जास्त पैसे, 'असं' तपासा तुमचं खातं

तुमच्या PF अकाउंटमध्ये लवकरच येणार जास्त पैसे, 'असं' तपासा तुमचं खातं

PF, EPFO - तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये किती पैसे आहेत, ते अशा प्रकारे तपासू शकता

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 सप्टेंबर : नोकरी करणाऱ्यांसाठी लवकरच मोठी चांगली बातमी मिळणार आहे. EPFO पुढच्या काही दिवसांमध्ये PF  खात्यात आर्थिक वर्ष 2018-19च्या व्याजाचे पैसे पाठवणार आहे. कामगार मंत्रालयानं तसे आदेश दिलेत.आर्थिक वर्ष 2017-18च्या तुलनेत 0.10 टक्के व्याज जास्त आहे. म्हणजे तुमच्या खात्यात आता जास्त पैसे येतील. मंत्रालयानं 8.65 टक्के व्याज मंजूर केलंय. तुम्हाला तुमच्या खात्यात किती पैसे पडलेत हे तपासून पाहायचं असेल तर आम्ही तुम्हाला सोपा उपाय सांगतो. तुम्ही मिस काॅलचा सर्विसचा वापर करू शकता. सोबत ऑनलाइन किंवा एसएमएसद्वारेही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. खूशखबर : मोदी सरकार कराबद्दल करणार मोठी घोषणा; सामान्यांना दिलासा? 1. PF बॅलन्स किती आहे हे जाणून घेण्यासाठी EPFO चं अॅप आहे. त्यात पहिल्यांदा मेंबरवर क्लिक करा. त्यानंतर युएएन नंबर आणि पासवर्ड टाका. त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यात किती पैसे आहेत. 2. यूजरला आता युनिफाईड पोर्टलऐवजी पीएफ पासबुक वेगळ्या वेबसाइटवर पाहता येणार आहे. या पोर्टलवर पीएफ बॅलेन्स तपासण्यासाठी PF क्रमांकासोबत UAN क्रमांक जोडलेलं असावं. पण पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी युनिफाईड पोर्टलचं काम करू शकतं. पेट्रोल आणि सोनं दोन्हीही महाग, राज्यातल्या या शहरात पेट्रोलचे दर सगळ्यात जास्त 3. तुमच्याकडे UAN क्रमांक नसेल तरीही पीएफ बॅलेन्स ऑनलाईन तपासता येतं फक्त यासाठी तुमच्याकडे पीएफ खातं असणं गरजेचं आहे. हा क्रमांक तुम्हाला पगाराच्या पावतीवरून मिळेल. वेबसाइटवर जाऊन आपापलं राज्य आणि प्रादेशिक कार्यालय निवडल्यानंतर योग्य ती माहिती नमुद करा. मग पीएफ बॅलेन्स संबंधित मेसेज तुमच्या मोबाईलवर येतो. 4. तुम्ही जर UAN क्रमांक अॅक्टिव्हेट केलं असेल तर तुमच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी एम्प्लॉईज प्रोव्हिडेट फंड ऑर्गनायजेशनकडे झालेली आहे. यानंतर तुम्ही 011-22901406 या क्रमांकावर मिस्डकॉल केल्यावर तुमचा पीएफ क्रमांक, नाव, जन्मतारीख अशा सर्व माहिती एम्प्लॉईज प्रोव्हिडेट फंड ऑर्गनायजेशनच्या (EPFO) SMS द्वारे मिळते. …तर खात्यावर दररोज जमा होतील 100 रुपये, RBI चा नवा नियम वाचलात का? 5. EPFO SMS सेवेच्या माध्यमातून तुम्ही प्रोव्हिडेट फंडात असलेली रक्कम जाणून घेता येऊ शकते. 07738299899 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुम्ही बॅलेन्सची माहिती मिळवू शकता. ज्या व्यक्तीनं UAN अॅक्टिव्हेट केलं असेल त्यांच्यासाठी ही सुविधा मर्यादेत आहे. 6. उमंग अॅपच्या साहाय्याने पीएफ बॅलेन्स तपासू शकता. सर्वप्रथम उमंग अॅप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून EPFO यावर क्लिक करा. यानंतर एम्प्लॉय सेंट्रिक सर्विसेसचं पेज ओपन होईल. यात तुम्हाला View Passbook पर्याय निवडून त्यात तुमचा UAN आणि मोबाईल क्रमांक टाकून OTP द्वारे पीएफ बॅलेन्स तपासता येऊ शकतं. VIDEO: ‘हिंदुस्तान आणि पाकिस्तानचं विभाजन सोपं होतं पण युतीची वाटणी सोपी नाही’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या