नवी दिल्ली, 06 फेब्रुवारी: भारतात सध्या पॅन कार्ड (PAN Card) हे सर्वांसाठी आवश्यक असलेलं एक महत्त्वाचं कागदपत्र आहे. बँकातील विविध कामांसाठी आणि सरकारी ओळखपत्र म्हणून पॅन कार्डची आवश्यकता भासते. पॅन कार्ड म्हणजे 10 अंकी ‘पर्मनंट अकाऊंट नंबर’ (Permanent Account number) असतो, जो अल्फान्यूमेरिक कोड पद्धतीने लिहिलेला असतो. कोणत्याही व्यक्तीच्या आर्थिक उलाढालीची सर्व माहिती या कोडमध्ये साठवली जाते. पॅन कार्ड हे आपल्याला आयकर विभागाकडून देण्यात येतं. त्यामुळे या पॅन कार्डमध्ये जर काही गडबड असेल, तर तुम्ही स्वतः त्यामध्ये बदल करू शकता. पॅन कार्डवरील फोटो बदलण्यासाठी ही प्रक्रिया वापरा » सर्वप्रथम NSDLच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. » त्यानंतर Application Type या पर्यायावर क्लिक करुन Changes किंवा correction in existing PAN Data या पर्यायावर क्लिक करा. » त्यानंतर कॅटेगरी मेनूमधून Individual हा पर्याय निवडा » याठिकाणी आवश्यक ती सर्व माहिती भरल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. » त्यानंतर पॅन अॅप्लिकेशनवरचा केवायसीचा (KYC) पर्याय निवडा. » येथे तुम्हाला Photo Mismatch आणि ‘Signature Mismatch’ चा एक ऑप्शन दिसेल. » येथे फोटो बदलण्यासाठी तुम्ही Photo Mismatch पर्यायवर क्लिक करू शकता. » त्यानंतर आई वडीलांची माहिती भरल्यानंतर नेक्स्ट (Next) बटणावर क्लिक करा. » सर्व माहिती भरल्यानंतर, अर्जदाराचे ओळखपत्र, पत्ता पुरावा आणि जन्माचा दाखला जोडावा. » यानंतर डिक्लरेशनवर टिक मार्क करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. » फोटो किंवा स्वाक्षरीमध्ये बदल करण्यासाठी भारतातील व्यक्तीसाठी अर्ज फी 101 रुपये (जीएसटीसहीत) आणि भारताबाहेरील पत्त्यांसाठी 1011 रुपये (जीएसटीसह) एवढी फी आहे. » या संपूर्ण प्रक्रियेनंतर 15-अंकी पावती क्रमांक प्राप्त होईल. » त्यानंतर अर्जाची प्रिंटआउट आयकर पॅन सर्व्हिसच्या युनिटला पाठवा. »या पावती क्रमांकाद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाला ट्रॅक करू शकता. त्वरित (Instant) पॅन कार्ड मिळवता येते प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, इन्स्टंट पॅन सुविधेअंतर्गत तुम्ही आधार कार्डच्या मदतीने अवघ्या दहा मिनिटात ई-पॅन कार्ड मिळवू शकता. या सुविधेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 7 लाखाहून अधिक पॅनकार्ड देण्यात आली आहेत. पॅन कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पॅनकार्ड मिळवण्यासाठी कोणत्याही भारतीय व्यक्तीला स्वतः चं ओळखपत्र, रहिवाशी पुरावा आणि जन्माचा दाखला किंवा वयाचा पुरावा ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या ओळखपत्रासाठी तुम्हाला अनेक पर्याय दिले जातील. या पर्यायातून तुमच्याकडे उपलब्ध असलेला पुरावा तुम्ही निवडू शकता.