बँकांची यूपीआय लिमिट काय?
मुंबई, 4 मार्च: ऑनलाइन पेमेंटमुळे लोकांचे जीवन खूप सोपे झाले आहे. तुम्ही मोठी रक्कम मोबाईलद्वारे कोणालाही सहज पेमेंट करू शकता. परंतु अनेक लोकांच्या मनात प्रश्न येतो की UPI द्वारे पेमेंटची मर्यादा काय आहे? तर ही मर्यादा बँकेनुसार बदलत असते. एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि इतर बँकांनी त्याच्या वेगवेगळ्या मर्यादा निश्चित केल्या आहेत. तुम्ही या लिमिटपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार करू शकत नाही.
सावधान! डेबिट कार्ड वापरताना तुम्ही करताय ‘ही’ चूक, होईल मोठे नुकसाननॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) नुसार, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही एक अशी प्रणाली आहे ज्यामध्ये तुम्ही एकाच मोबाईल अॅपद्वारे तुमचे एकापेक्षा जास्त बँक अकाउंट सहजपणे लिंक करू शकता. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत. फक्त त्याचा नंबर टाकून आणि तुमचा UPI पिन टाकून सहज पैसे पाठवू शकता.
NPCI नुसार, UPI च्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती एका दिवसात त्याच्या अकाउंटमधून जास्तीत जास्त एक लाख रुपये पाठवू शकते. ही लिमिट प्रत्येक बँकेनुसार बदलते. Google Pay ने देशातील प्रमुख बँकांच्या UPI लिमिटची संपूर्ण लिस्ट जारी केली आहे. चला जाणून घेऊया.
Aadhaar Card हरवलंय? चुकीचा वापर होऊ नये म्हणून असं करा लॉक-स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये UPI ट्रांझेक्शनची लिमिट 1 लाख रुपये आहे. -HDFC बँकेत UPI ट्रांझेक्शनची लिमिट 1 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. मात्र, नवीन ग्राहकांसाठी ही मर्यादा पाच हजार रुपये आहे. -ICICI बँकेचे ग्राहक 10,000 रुपयांपर्यंत UPI व्यवहार करू शकतात, परंतु Google Pay यूझर्ससाठी ही मर्यादा 25,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. -अॅक्सिस बँकेने UPI ट्रांझेक्शनची लिमिट 1 लाख रुपये केली आहे. -बँक ऑफ बडोदाने UPI ट्रांझेक्शनची लिमिट 25,000 रुपये ठेरवली आहे.