मुंबई, 1 जुलै : देशात रस्त्यांचा दर्जा सातत्याने सुधारत आहे आणि लोक आता वैयक्तिक वाहने घेऊनही लांबचा प्रवास करत आहेत. मात्र, चांगल्या रस्त्या जेथे आहे तिथे टोल हा हमखास भरावा लागतो. आता देशभरात टोलची संख्या सातत्याने वाढत आहे, जिथे वाहन चालकाला शुल्क भरावे लागते. फास्टॅग (FASTag) येण्यापूर्वी वाहनचालकांना टोलवर रोख रक्कम भरावी लागत होती, मात्र या सुविधेनंतर आता बरीच सोय झाली आहे. जे FASTag वापरतात त्यांच्या खात्यातून थेट टोलची रक्कम कापली जाते. मात्र अनेक वेळा टोलपर्यंत पोहोचले तरी आपल्या फास्टॅग खात्यात किती रुपये आहेत हे अनेकांना कळत नाही. अशा परिस्थितीत अनेक वेळा टोलवर पैसे कापले जात नाहीत आणि त्यांना दुप्पट रक्कम भरावी लागते. ही समस्या टाळण्यासाठी, टोल शिल्लक जाणून घेण्याचे चार सोपे मार्ग आहेत. तुमच्या खात्यातील रक्कम शोधण्यासाठी तुम्ही यापैकी कोणतीही पद्धत वापरू शकता. केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 5 टक्क्यांनी वाढवलं, सोन्याच्या किमतीवर काय परिणाम होणार? फास्टॅग अॅपवरून शिल्लक तपासा FASTag अॅपद्वारे तुमच्या खात्यातील रक्कम जाणून घेणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला प्रथम Google App वरून My FasTag अॅप इन्स्टॉल करावे लागेल. त्यात आवश्यक माहिती टाकल्यानंतर, तुमचे अॅप उघडेल आणि तुम्हाला हवे तेव्हा तुमच्या फास्टॅगची शिल्लक सहज तपासता येईल. बँकेच्या वेबसाइटवरून तुम्ही बँकेच्या वेबसाइटवरून देखील तुमची FASTag शिल्लक तपासू शकता. ज्या बँकेशी तुमचे FASTag खाते लिंक आहे त्या बँकेच्या वेबसाइटवर जा आणि FASTag पोर्टलवर आवश्यक माहिती भरा. लॉग इन केल्यानंतर, तुम्ही तळाच्या व्ह्यू बॅलन्सवर जाऊन तुमच्या खात्यातील रक्कम तपासू शकता. आजपासून अनेक नवीन आर्थिक बदल लागू; तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल? SMS वरून माहिती मिळवा हा सर्वात सोपा मार्ग आहे, कारण तुमचे खाते ज्या बँकेशी जोडलेले आहे, प्रत्येक टोलवर पैसे कापल्यानंतर शिल्लक रकमेची माहिती दिली जाते. जर तुम्ही FASTag सेवेचा पर्याय निवडला असेल, तर प्रत्येक टोलसह, बँकेकडून उर्वरित रकमेचा मेसेज पाठवला जातो. या मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला खात्यात किती रक्कम शिल्लक आहे हे कळू शकते. टोल फ्री नंबरवर कॉल करा जर वरीलपैकी कोणतीही सुविधा तुमच्यासाठी काम करत नसेल, तर तुम्ही NHAI ने दिलेल्या टोल फ्री नंबरवर कॉल करून तुमच्या FASTag खात्यातील रक्कम देखील शोधू शकता. यासाठी तुम्हाला NHAI च्या प्रीपेड वॉलेटवर नोंदणी करावी लागेल. यानंतर, तुम्ही 8884333331 वर कॉल करून शिल्लक जाणून घेऊ शकता.