फिक्स्ड डिपॉझिट
नवी दिल्ली, 6 जून : ज्यावेळी कोणीही आपला पैसा गुंतवण्याचा विचार करतो. तेव्हा त्याच्या मनात रिटर्न किती मिळणार याचा विचार येतो. आपले पैसे किती दिवसांत दुप्पट होतील हे प्रत्येकाला पाहायलाचं असतं. तुमचे पैसे दुप्पट करणे हे तुम्ही किती काळ गुंतवणूक करता आणि त्यावर तुम्हाला किती व्याज किंवा रिटर्न मिळतो यावर अवलंबून असते. यासाठीच आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत. त्याद्वारे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीतून तुमचे पैसे दुप्पट कसे होणार हे पाहू शकता.
एका छोट्या आणि सोप्या नियमाच्या आधारे, सध्याची गुंतवणूक सधी दुप्पट होईल याचा अंदाज लावता येतो. त्यालारूल ऑफ 72 (Rule of 72)असेही म्हणतात. हा नियम पैसे दुप्पट करण्याची अंदाजे कल्पना देतो. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हा नियम.
Rule 72 हा अतिशय सोपा फॉर्म्युला आहे. जो फार कमी लोकांना माहीत आहे. या नियमानुसार, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज ‘72’ ने विभाजित करता. यावरून तुम्हाला अंदाज येतो की तुमचे पैसे किती दिवसांत दुप्पट होतील. 72 चा नियम अंदाजे आयडिया देतो.
समजा तुम्ही बँकेत वार्षिक 6.25 टक्के व्याजदराने मुदत फिक्स्ड डिपॉझिट केले आहे. अशा वेळी, तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे 11 वर्षे लागतील. आता तुम्ही म्हणाल की 11 वर्षे लागतील हे कसे कळले. यासाठी हे छोटे आणि अतिशय सोपे गणित समजून घ्या. यासाठी तुम्हाला 72 मध्ये उपलब्ध व्याजदर म्हणजे 6.25 मध्ये विभाजित करावा लागेल. लाभांश उत्पन्न 11.52 वर्षात येईल.
चेकवर अमाउंटनंतर Only का लिहितात? अमाउंटपेक्षाही हे लिहिणं महत्त्वाचं, पण का?तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करायचे असल्यास तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल? आता या फॉर्म्युलामध्ये किरकोळ बदल करून, तुम्ही हे देखील शोधू शकता. तुम्हाला निश्चित वेळेत किती गुंतवणूक करावी लागेल की तुमचे पैसे दुप्पट होतील. आता हे देखील जाणून घेऊया. जर तुम्हाला तुमचे पैसे 3 वर्षात दुप्पट करायचे असतील तर तुम्हाला दरवर्षी सुमारे 21 ते 24 टक्के (72/3 वर्षे) रिटर्न मिळायला हवा. तरच तुमचे पैसे दुप्पट होतील. त्याचप्रमाणे, जर तुम्हाला तुमचे पैसे 5 वर्षांत दुप्पट करायचे असतील, तर त्यासाठी तुम्हाला दरवर्षी किमान 14.4 टक्के (72/5) दराने व्याज मिळायला हवे. जर 10 वर्षात पैसे दुप्पट करायचे असतील तर दरवर्षी सुमारे 7.2 टक्के दराने व्याज मिळायला हवे.