JOIN US
मराठी बातम्या / मनी / RBI कर्ज घेऊन मोदी सरकारला किती दिवस उधार देणार? रघुराम राजन यांची टीका

RBI कर्ज घेऊन मोदी सरकारला किती दिवस उधार देणार? रघुराम राजन यांची टीका

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नोटाबंदीपासून ते आता कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनपर्यंत आपलं मत स्पष्टपणे मांडलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिंगापूर, 23 जुलै : आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नोटाबंदीपासून ते आता कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनपर्यंत आपलं मत स्पष्टपणे मांडलं आहे. आताही ते स्पष्टपणे अर्थव्यवस्थेत होणारी कमतरता व्यक्त करीत आहेत. RBI कर्ज काढून किती दिवस मोदी सरकारला पैसे पुरवणार? असा ज्वलंत सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आरबीआयचे माजी गव्हर्नक रघुराम राजन यांनी कोरोनाच्या संकट काळात बँकेद्वारे सुरू करण्यात आलेल्या मोनेटायझेशन प्रोग्रामवर प्रश्न उपस्थित केला आहे. अशा प्रकारचे प्रोग्राम हे कोणत्याही आर्थिक संकट सोडवू शकत नाही. सध्या देशातील अर्थव्यवस्था संकटात आहे. अशात आरबीआयकडून अतिरिक्त नगदी ऐवजाच्या रुपात सरकारी बाँडती खरेदी केली जात आहे. त्यामुळे देणं वाढत चाललं आहे. हे वाचा- BPCL विकण्यासंदर्भात सरकारची आज होणार महत्त्वाची बैठक, वाचा सविस्तर फायनान्शिअल एक्सप्रेसने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. सिंगापूर येथील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. रेपो रेट कमी करुन कर्ज स्वस्त करण्यात येत आहे. परंतु सध्या नोकरी आणि कंपन्यांची परिस्थिती वाईट आहे. कोणाही रिस्क घेऊन कर्ज काढणार नाही. सध्या पैसे बचत करण्यात प्रमाण वाढलं आहे. अशा परिस्थितीत बँका त्यांचे पैसे रिझर्व्ह बँकेत जमा करीत आहेत. त्यांना जे व्यास मिळतं त्यालाच रिव्हर्स रेपो रेट म्हटलं जातं. मात्र राजन यांच्यामते रिझर्व्ह बँक हे पैसे सरकारला उधार म्हणून देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या