JOIN US
मराठी बातम्या / मनी / काय सांगता! LPG सिलिंडर फक्त 750 रुपयांना मिळणार, ही कंपनी देतेय ऑफर, कसा घ्याल लाभ?

काय सांगता! LPG सिलिंडर फक्त 750 रुपयांना मिळणार, ही कंपनी देतेय ऑफर, कसा घ्याल लाभ?

कंपोझिट सिलिंडरची सुविधा इंडेन कंपनीने सर्वसामान्यांसाठी सुरू केली आहे. या सिलेंडरचे वजन सामान्य सिलेंडरपेक्षा कमी आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे तुम्ही ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेऊ शकता. सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही ते खूप चांगले आहे.

जाहिरात

LPG सिलिंडर फक्त 750 रुपयांना मिळणार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : एलपीजीच्या वाढत्या किमतींमुळे सगळेच हैराण झाले आहेत. दैनंदिन घरगुती वापराच्या गोष्टी जेव्हा महाग असतात तेव्हा आपल्यावर अधिक परिणाम करतात. एलपीजी (LPG) हा त्यापैकी एक आहे. वाढत्या महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आता पुढाकार घेताना दिसत आहे. एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमती नियंत्रित करण्यासाठी सरकार मोठे पाऊल उचलू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार यासाठी अतिरिक्त सबसिडी जारी करू शकते. सध्या दिल्लीत 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत 1053 रुपये आहे. जर तुम्ही नवीन गॅस कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी जास्त पैसे खर्च करू इच्छित नसाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. वास्तविक, सरकारी मालकीची तेल कंपनी इंडेनने ग्राहकांच्या सोयीसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या अंतर्गत तुम्हाला कमी किमतीत एलपीजी सिलेंडर मिळू शकेल. इंडेनच्या या नवीन प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त 750 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर मिळेल. म्हणजेच तुम्हाला हा गॅस सिलिंडर सामान्य किमतीपेक्षा सुमारे 300 रुपयांनी स्वस्त मिळेल. इंडेनची नवीन सुविधा काय आहे? कंपोझिट सिलिंडरची सुविधा इंडेन कंपनीने सर्वसामान्यांसाठी सुरू केली आहे. या सिलेंडरचे वजन सामान्य सिलेंडरपेक्षा कमी आहे. त्यामुळे त्याची किंमतही कमी ठेवण्यात आली आहे. हा सिलिंडर तुम्ही फक्त 750 रुपयांना खरेदी करू शकता. त्याची खास गोष्ट म्हणजे तुम्ही ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेऊ शकता. वाचा - LPG सिलेंडरच्या किमती कमी होणार? केंद्र सरकार उचलणार मोठं पाऊल, किती मिळणार दिलासा? कंपोझिट सिलेंडर म्हणजे काय कंपोझिट सिलिंडर नियमित सिलिंडरपेक्षा वजनाने हलके असतात. यामध्ये तुम्हाला 10 किलो गॅस मिळतो. त्यामुळे या सिलिंडरची किंमतही कमी ठेवण्यात आली आहे. या सिलिंडरचे वैशिष्ट्य म्हणजे ते पारदर्शक आहेत. सध्या ही सुविधा फक्त 28 शहरांमध्ये उपलब्ध इंडेन सध्या 28 शहरांमध्ये ही सुविधा देत आहे. लवकरच त्याचा विस्तार करण्यात येणार असून हे सिलिंडर सर्व शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. यासाठी कंपनी सध्या काम करत आहे. त्यामुळे तुमच्याही शहरात भविष्यात हा सिलिंडर मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या