JOIN US
मराठी बातम्या / मनी / 2 हजाराच्या नोटा बदलण्याची मुदतवाढ? 500 ऐवजी 1 हजाराची नोट येणार? सरकारने दिली उत्तरे

2 हजाराच्या नोटा बदलण्याची मुदतवाढ? 500 ऐवजी 1 हजाराची नोट येणार? सरकारने दिली उत्तरे

एका खासदाराने विचारलं की, सरकार काळा पैसा संपुष्टात आणण्यासाठी इतर मोठ्या नोटांचे निश्चलीकरण करण्यात येणार आहे का? या प्रश्नावरही सरकारने अशी कोणती योजना नसल्याचे स्पष्ट केले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 जुलै : भारतीय रिजर्व्ह बँकने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून परत घेण्याची घोषणा याआधीच केली आहे. त्या परत घेण्यासाठी आणि बँकेत जमा करण्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंत शेवटची मुदत दिली आहे. मात्र लोकांच्या मनात अद्यापही प्रश्न आहे की ही मुदत वाढवली जाणार आहे का? संसदेत खासदारांनी सरकारला याबाबत विचारले. दरम्यान, अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत वाढवण्यात आलेली नाही. ३० सप्टेंबर पर्यंतच नोटा बँकेत जमा करता येतील. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह इतर खासदारांनी २ हजार रुपयांच्य नोटांसह इतर अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावर अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी उत्तरे दिली. २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्याबाबत सरकारला महत्त्वाचा प्रश्न असा विचारला गेला की, या नोटा सप्टेंबर २०२३ नंतर बदलण्यासाठी मुदत वाढवली जाणार आहे का? असेल तर त्याची माहिती द्यावी. यावर उत्तर देताना अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी यांनी सांगितलं की, सध्या असा कोणताच विचार नाही. EPFO : मोदी सरकारने दिली गुड न्यूज! PF वरील व्याज वाढवण्याची घोषणा एका खासदाराने विचारलं की, सरकार काळा पैसा संपुष्टात आणण्यासाठी इतर मोठ्या नोटांचे निश्चलीकरण करण्यात येणार आहे का? या प्रश्नावरही सरकारने अशी कोणती योजना नसल्याचे स्पष्ट केले. सरकारकडे इतर नव्या नोटा वाढवण्याचा किंवा १ हजार रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याचा विचार आहे का? असाही प्रश्न विचारला गेला होता. यावर अर्थ राज्य मंत्र्यांनी सांगितले की, आरबीआय़नुसार २ हजार रुपयांच्या नोटा या करन्सी मॅनेजमेंट ऑपरेशनचा भाग होत्या. लोकांना कोणत्याही प्रकारे अडचण निर्माण होऊ नये. अर्थव्यवस्थेत समस्या होऊ नये यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने हे केलं होतं. याशिवाय २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर त्याऐवजी इतर मुल्याच्या नोटा पुरेशा असल्याचंही सरकारने सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या