नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी: लग्नसराईचे दिवस सुरू असताना सोने-चांदी दरात (Gold Silver Price Today) चढ-उतार सुरू आहेत. मागील चार दिवसांपासून सोने दरात (Gold Rate) सतत वाढ होत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज एप्रिल डिलीव्हरी सोन्याचा भाव 0.01 टक्क्याने वाढला आहे. तर चांदीचा दर (Silver price) 0.13 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. आज सोनं वायदे भाव 48,666 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. सर्वोच्च स्तरावरुन सोनं अद्यापही जवळपास 7,500 रुपये स्वस्त मिळत आहे. चांदीचा भाव - आज सोने दर 0.01 टक्क्यांच्या वाढीसह 48,666 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर आज चांदीचा भाव काहीसा घसरला आहे. चांदीच्या दरात 0.13 टक्क्यांची घसरण झाली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 62,606 रुपये आहे.
कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. कमॉडिटी जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोने दरात सतत वाढ होण्याची अनेक कारणं आहेत. युक्रेन संकटाने जगभरात अनिश्चिततेचं वातावरण तयार केलं आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांचा कल सोन्याकडे वाढला आहे. कारण सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.