JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ; चांदीही महागली, चेक कर नवे दर

Gold Price Today: ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ; चांदीही महागली, चेक कर नवे दर

Gold-Silver Price: आजही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सकाळच्या व्यवहारात सोन्याचा भाव 51 हजारांच्या वर तर चांदीचा भाव 62 हजारांच्या वर गेला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 मे: मागील आठवड्यापर्यंत सोन्यात सतत घसरण (Gold Price Today) होताना दिसत होता. मात्र आता ऐन लग्नसराईत मागणी वाढल्याने सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) वाढ होताना दिसत आहे. आजही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सकाळच्या व्यवहारात सोन्याचा भाव 51 हजारांच्या वर तर चांदीचा भाव 62 हजारांच्या वर गेला आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोमवारी सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची फ्युचर्स किंमत 7 रुपयांनी किरकोळ वाढून 51,350 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. यापूर्वी सोन्याचा व्यवहार 51,259 रुपयांपासून सुरू होता, परंतु खरेदी आणि मागणी वाढल्याने लवकरच सोन्याची फ्युचर्स किंमत 0.01 टक्क्यांनी वाढून 51,350 रुपयांवर पोहोचली. गेल्या सलग सत्रात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. रेल्वेतील बेशिस्त प्रवाशांचा इतरांना फटका; मुंबईतील अनेक स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात पाच पट वाढ चांदीच्या दरातही वाढ चांदीच्या दरातही (Silver Price Today) आज तेजी दिसून येत आहे. एमसीएक्सवर आज सकाळच्या व्यवहारात चांदीचा भाव 52 रुपयांनी वाढून 62,600 रुपये प्रति किलो झाला. यापूर्वी चांदीचा व्यवहार 62,450 रुपयांवर सुरू होता, परंतु मागणी आणि खरेदी वाढल्याने लवकरच त्याची किंमत 0.08 टक्क्यांनी वाढून 62,600 वर पोहोचली. जागतिक बाजारात सोने खाली आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. आज सकाळी अमेरिकन बाजारात सोने 0.29 टक्क्यांनी घसरून 1,876.05 डॉलर प्रति औंस झाले. मात्र, याउलट चांदीच्या दरात किंचित वाढ झाली. आज सकाळच्या व्यवहारात चांदी 0.6 टक्क्यांच्या वाढीसह 22.3 डॉलर प्रति औंसवर विकली जात आहे. निवृत्तीनंतर आर्थिक गरज भागवण्यासाठी ‘या’ सरकारी योजनेचा फायदा घ्या, 10 हजारांपर्यंत मिळेल पेन्शन डॉलरच्या कमजोरीमुळे सोने मजबूत यूएस फेड रिझर्व्हने आपल्या व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली, त्यामुळे जागतिक बाजारात डॉलर कमकुवत होऊ लागला आणि सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. फेड रिझर्व्हचे प्रमुख यांनी सांगितले आहे की व्याज 0.75 टक्क्यांनी वाढण्याची देखील शक्यता आहे. यापूर्वी भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. 18 एप्रिलपासून सोने प्रति 10 ग्रॅम सुमारे 2,500 रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर चांदी 8,800 रुपयांनी घसरली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या