JOIN US
मराठी बातम्या / मनी / विदेशी बाजारात उतरले सोन्याचे दर, भारतात आज स्वस्त होणार सोने

विदेशी बाजारात उतरले सोन्याचे दर, भारतात आज स्वस्त होणार सोने

अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्ह (US Federal Reserve) व्याजदरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम शेअर बाजार आणि सोन्याच्या किंमतीवर देखील झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्ह (US Federal Reserve) व्याजदरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम शेअर बाजार आणि सोन्याच्या किंमतीवर देखील झाला आहे. त्यामुळे सोन्याचे दर विदेशी बाजारात घसरले आहेत. त्यामुळे देशांतर्गत व्यावसायिकांचे असे म्हणणे आहे की सोन्याच्या किंमतीवर आज देखील दबाव राहील. त्यांनी असे सांगितले की, बुधवारी सोने आणि चांदीच्या (Gold and Silver Rates) स्पॉट किंमतीत घसरण पाहायला मिळाली. मंगळवारी सोनेचांदीच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. मंगळवारच्या उसळीमुळे बुधवारी घसरण होऊन देखील सोने 53 हजार तर चांदी 70 हजारांच्या वर होती. एचडीएफसी सिक्योरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर 137 रुपयांनी घटले होते. परिणामी सोन्याचे दर प्रति तोळा 53,030 रुपये झाले होते. मंगळवारी हे दर 53,167 रुपये प्रति तोळा होते. (हे वाचा- Credit-Debit कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, 30 सप्टेंबरपासून बदलणार हे नियम) बुधवारी चांदीची किंमत 517 रुपयांनी कमी झाली होती. या घसरणीनंतर चांदी प्रति किलो 70,553 रुपयांवर आली होती. मंगळवारी चांदीची किंमत 71,070 रुपये प्रति किलो होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती वाढल्या होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर 1,967.7 डॉलर प्रति औंस तर चांदीचे भाव 27.40 डॉलर प्रति औंस होते. (हे वाचा- PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी, खात्यातून पैसे काढण्यासाठी या चुका टाळा ) दरम्यान दुसरीकडे वायदे बाजारात सोनेचांदीच्या किंमती वाढत आहेत. विदेशी बाजारातून आलेल्या संकेतामुळे बुधवारी वायदे बाजारात सोन्याचे आणि चांदीचे दर वाढले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याची किंमत 153 रुपये किंवा 0.30 टक्क्यांनी वाढून 51,922 रुपये प्रति तोळा झाली आहे. तर डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या चांदीची किंमत 33 रुपये किंवा 0.05 टक्क्यांनी वाढून 69,000 रुपये प्रति किलो झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या