JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: सोन्याच्या दरात सहाव्या दिवशी घसरण, आठवडाभरात सोनं 1600 रुपयांनी स्वस्त

Gold Price Today: सोन्याच्या दरात सहाव्या दिवशी घसरण, आठवडाभरात सोनं 1600 रुपयांनी स्वस्त

Gold Price Today: मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24-कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची फ्युचर्स किंमत सोमवारी सकाळी 0.44 टक्क्यांनी किंवा 230 रुपयांनी घसरून 52,030 रुपये प्रति ग्रॅम झाली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 एप्रिल : सोने खरेदी करण्याची सध्या योग्य वेळ आहे. लग्नसराईचा हंगाम (Wedding Season) असूनही जागतिक बाजारात मंदीमुळे सोन्याच्या दरात (Gold Price Today) सलग सहाव्या दिवशी घसरण झाली. सोमवारीही सोन्याचा भाव 0.44 टक्क्यांनी घसरला. आठवडाभरातच त्याच्या किमती 1,600 रुपयांनी कमी झाल्या आहेत. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24-कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची फ्युचर्स किंमत सोमवारी सकाळी 0.44 टक्क्यांनी किंवा 230 रुपयांनी घसरून 52,030 रुपये प्रति ग्रॅम झाली. चांदीच्या दरातही (Silver Price Today) घसरण झाली आणि फ्युचर्सचा भाव 1.25 टक्क्यांनी किंवा 829 रुपयांनी घसरून 65,717 रुपये प्रति किलो झाला. गेल्या सहा व्यापार सत्रांमध्ये सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम सुमारे 1600 रुपयांची घसरण झाली आहे. जागतिक बाजारातील भाव दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर यूएस फेड रिझर्व्हने चलनविषयक धोरणे कडक करण्याचे आणि व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या स्पॉट किमतीने दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळी गाठली आहे. सोमवारी सकाळी सोन्याची स्पॉट किंमत 0.3 टक्क्यांनी घसरून 1,923.74 डॉलर प्रति औंस झाली. 7 एप्रिलनंतरची ही सर्वात कमी किंमत आहे. Money Management Apps: तुमचे पैसे कुठे खर्च झाले? ‘या’ पाच अप्सच्या मदतीने हिशेब ठेवणे होईल सोपं सोन्याव्यतिरिक्त इतर मौल्यवान धातूंच्या स्पॉट किमतीतही घट झाली आहे. चांदी 1 टक्क्यांनी घसरून 23.89 डॉलर प्रति औंस, प्लॅटिनम 0.4 टक्क्यांनी घसरून 927 डॉलर आणि पॅलेडियम 2.9 टक्क्यांनी घसरून 2,305.69 डॉलरवर आले. सोन्याच्या दरात घसरण होण्यामागे डॉलरची मजबूती हेही प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. CIBIL Score चांगला ठेवा, लवकर स्वस्त कर्ज ते जास्त क्रेडिट लिमिटसह मिळतात अनेक फायदे सोन्याचा भाव 52 हजारांच्या खाली जाईल पुढील महिन्यात अमेरिकन फेड रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. जागतिक बाजारात सोने प्रति औंस $1,905 पर्यंत जाऊ शकते, तर भारतीय बाजारात ते 52 हजारांच्या खाली जाईल. सोने 51,650 ते 52,500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या श्रेणीत राहील, असा तज्ञांचा अंदाज आहे. IMF च्या अंदाजाने सोन्याचे दर तुटले आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावण्याचा अंदाज वर्तवला आहे. आयएमएफने म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 3.8 टक्क्यांऐवजी 3.6 टक्के दराने वाढेल. यानंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 5 टक्क्यांची घसरण झाली आणि पिवळ्या धातूची मागणीही वाढली. IMF ने महागाई वाढण्याचा अंदाज देखील वर्तवला आहे, ज्यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत घट झाली कारण त्यांची मागणी मंदावली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या