JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: आज सलग सातव्या दिवशी सोने दरात वाढ, दर 50 हजार पार; चांदीचा भावही वधारला

Gold Price Today: आज सलग सातव्या दिवशी सोने दरात वाढ, दर 50 हजार पार; चांदीचा भावही वधारला

Gold Price Today: आज सोने दर 50000 रुपयांवर गेला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोने दरात (Gold Price Today) 0.56 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी: सोने दरात (Gold Price) आज सलग सातव्या दिवशी वाढ झाली आहे. वाढत्या किमतींमुळे पुन्हा एकदा गोल्ड आपल्या रेकॉर्ड किमतीजवळ पोहोचत आहे. आज सोने दर 50000 रुपयांवर गेला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोने दरात (Gold Price Today) 0.56 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर 7 फेब्रुवारी रोजीचा गोल्ड दर 0.19 टक्क्यांच्या वाढीसह 48,014 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आजचा सोने - चांदी दर (Gold Silver Price) - आज एप्रिल डिलीव्हरी गोल्ड रेट 0.56 टक्क्यांच्या वाढीसह 50 हजारांवर पोहोचला आहे. आज सोन्याचा दर 50,196 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज चांदीचा भावही (Silver Price Today) 0.46 टक्क्यांच्या तेजीसह 64,529 रुपये प्रति किलोग्रॅम ट्रेड करत आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

हे वाचा -  Petrol Diesel Prices Today: क्रूड ऑइल 7 वर्षांच्या सर्वोच्च स्तरावर, तपासा पेट्रोल-डिझेल दर

कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. अमेरिकेसह जगभरात वाढत्या महागाईमुळे सोन्याच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. कमोडिटी एक्सपर्ट आणि केडिया अ‍ॅडव्हायझरीचे डायरेक्टर अजय केडिया सांगतात, की महागाईचा धोका जसजसा वाढेल तसतसा सोन्याच्या किमतीवरही परिणाम होईल. महागाईचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होतो. त्यामुळे येत्या काळात सोन्याचे भाव वाढतील अशी शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या