नवी दिल्ली, 22 एप्रिल : आज शुक्रवारी 22 एप्रिल रोजी सोने दरात तेजी असून चांदीचा भाव काहीसा कमी झाला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सकाळी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा वायदे भाव 87 रुपयांनी (Gold Price Today) वाढून 52,500 रुपये झाला आहे. तर चांदीचा भाव 47 रुपयांनी कमी झाला असून 67076 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड (Silver Price Today) करत आहे. 21 एप्रिल रोजी गुरुवारी MCX वर सोन्याचा भाव 52413.00 रुपयांवर बंद झाला होता. तर चांदीचा भाव 67125.00 वर बंद झाला होता. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 46 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या कमीसह 52,367 रुपये 10 ग्रॅमवर बंद झाला. सराफा बाजारात चांदीचा भाव गुरुवारी 103 रुपयांनी कमी झाला आणि दर 67,968 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला. IIFL सिक्योरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी देशांतर्गत घटकांबद्दल बोलताना सांगितलं, की एप्रिल ते जूनमध्ये सोन्याची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. भारतात लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. सोन्याचा किमतीसाठी हे प्रमुख देशांतर्गत ट्रिगर म्हणून काम करेल. तसंच कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या किमतीतही मागील आठवड्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे जागतिक चलनवाढीची भीती आणखी वाढली आहे. याचा परिणामही सोने दरावर होऊ शकतो. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
कशी तपासाल सोन्याची शुद्धता - तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.