मुंबई : कोव्हिड काळात सोन्याने सर्वोच्च दर गाठला होता. जवळपास ५६ हजार रुपये प्रति तोळा सोनं होतं. मात्र हळूहळू दोन वर्षात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आता सोन्याचे दर भारतात ५० हजार रुपयांपेक्षाही कमी आहेत. गेल्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सोन्याचे दर घसरले आहेत. नेमकं सोन्याचे दर एवढे घसरण्यामागे काय कारण आहे जाणून घेऊया. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये २९ महिन्यांतील सर्वात निच्चांकी सोन्याचे दर शुक्रवारी बाजारपेठ बंद होताना पाहायला मिळाले. एप्रिल २०२० पासून पहिल्यांदाच किंमत एवढी खाली उतरली आहे. ०.७ टक्क्यांनी हे दर घसरले. आता येत्या काळात ०.६ टक्क्यांनी दर घसरतील अशी चिंता आहे. महागाई वाढते तेव्हा लोक सोन्याकडे वळतात मात्र गोल्ड बॉण्डवर व्याजदर वाढवल्यानंतर लोक सोनं स्वत : कडे ठेवणं पसंत करत नाहीत. लोक गोल्डमधील पैसे काढतात. डॉलरची किंमत वाढत आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यातील जोखमी देखील वाढताना दिसत आहे. हे वाचा-Gold-Silver Rate : खरेदीची हिच ती योग्य वेळ, वाचा किती रुपयांनी स्वस्त झालं सोनं US फेडरलच्या आजच्या बैठकीवरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत. त्यांच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयाचा परिणाम केवळ शेअर मार्केटच नाही तर सोन्या-चांदीच्या दरावरही होणार असल्याची माहिती मिळाली आहे. फेडची दोन दिवस बैठक सुरू आहे. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींवर चर्चा सुरू आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होऊ शकतो. या बैठकीमध्ये ७५ पॉईंट्सने इंटरेस्ट रेट वाढवण्याबाबत चर्चा सुरू आहे. परिणामी 100 बीपीएसची बाजारपेठेत वृद्धी होऊ शकते. याचंही प्रमाण केवळ २० टक्के असल्याची माहिती मिळाली आहे. चांदीमध्ये 1.1 टक्के घसरण झाली आहे. तर प्लॅटिनममध्ये 0.3 टक्क्यांनी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आजची बैठक खूप महत्त्वाची आहे.us